पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फुटाणे डाळं चटणी -अन्नपूर्णा वारसा

इमेज
  साहित्य आणि कृती  वाटीभर फुटाणे डाळ  (आमटीची वाटी माप) डाळ ताजे असावे म्हणजे खमंग असते अन्यथा उन्हात थोडा वेळ डाळं ठेवून गरम करून घ्यावे. ताजी कोथिंबीर स्वच्छ धुऊन वाळवलेली अर्धा वाटी, एक अथवा दोन हिरवी मिरची चवीनुसार तुकडे करून घ्यावेत,  ताजा कढीपत्ता  चार पाच पाने, मिसळण्याच्या डब्यातील  चमचा माप...अर्धा चमचा भर मीठ,अर्धा चमचा भर हिंग, एक चमचा साखर , भाजलेले साल काढलेले शेंगदाणे एक ते दीड टेबलस्पून  कृती: वरील सर्व जिन्नस एकत्र करून  मिक्सर मधून जाडेभरडे दळून घ्यावेत.चव चांगली लागते  फार पूड करु नये  . ही चटणी झटपट होते तसेच कोरडी आहे परंतु त्यामध्ये कोथिंबीर असल्याने तीन-चार दिवसाच्या पुढे टिकत नाही. लागेल तशी करून घ्यावी. आपण इडली बरोबर ओल्या नारळाच्या खोबऱ्याची चटणी खातो त्या ऐवजी ही चटणी दही अथवा ताक घालून वरून  मोहरीची फोडणी कढीपत्ता एक-दोन पाने सह  दिल्यास (ज्यांना हवे असेल त्यांनी वरून त्यात एखादी हिरवी अथवा लाल मिरची टाकावी ) खूप छान लागते.