आला क्षण.... गेला क्षण...

आज सकाळी गच्चीत कपडे वाळत घालताना अंगावर येत होतं कोवळं ऊन,आनंद उल्हासीत होत होतं...  तन मन आणि क्षणात गच्चीसमोरच्या निलगिरीच्या झाडावरील अडकलेला पतंग दृष्टीस पडला .  झाले मन खिन्न आणि मग ....सुचल्या या काव्यपंक्ती..... 

आला क्षण.... गेला क्षण...


पतंग झेपे उंच आकाशात

घेई भरारी झोकात

पतंग दोरी बालकाच्या हातात

खुले हास्य भारी गालात

पतंग आणि बालक दोघे आता

नाचू लागले तालात डौलात


क्षणात होई घात

काटतो कुणी पतंग दोरी

वरचेवरी आकाशात

होई वाताहात


मग हिरमुसे बालक

होई खिन्न

शोध घेई दिनभर

दमून झोपे आईच्या मांडीवर

पतंगही खिन्न

अडकला झाडावर

अंग चोरून घेई फांदीवर


स्वप्न पडे बालका

बोली पतंग

येशील कधी करण्या माझी सुटका

सुरु होण्या खेळ पुन्हा आपुल्या मनासारखा


सुटला पहाट वारा

लागे चाहूल तयास

जाणलं  त्यानं

झाले दोन सवंगडी उदास


मिटवाया तगमग हालू लागे फांदी

पुटपुटे पतंग स्वतःशी

बरे झाले अडकलो आपण हिरव्या पानात फांदीपाशी


वारा येई जोराचा,

फांदी हले झुले वर-खाली नादात

हलकेच सोडून देई पतंगाला त्याच्या अंगणात


होता सूर्योदय

बालक होई जागे

पाहता अंगणात पतंग

धरे त्याला हातात

बिलगी आई-बाबासं आवेगात,हर्षभरात


nandkishorslele.blogspot.com 


टिप्पण्या

अनिल पाठक म्हणाले…
निसर्गाचं मानावा बरोबर असलेलं नातं खूप छान उलगडलं आहे.
अनिल पाठक
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अनिल तुझा अभिप्राय वाचून आनंद द्विगुणित झाला.
Rajesh म्हणाले…
Waaa...manatalya bhavna shabdat chhan utaravlya ahat tumhi...
S G Deshpande म्हणाले…
पतंग आणि बालकाचं अतूट आणि हळुवार नातं, खूपच सुंदर आलय कवितेत ,
एकाच वेळेस दोघांचीही उदास अवस्था शेवटी परत दोघेही हर्षभरित
Jayant Kale म्हणाले…
छोट्या बालकाचे मन छान उलगडले आहे. मस्तच.👌
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अभिप्राय वाचून आनंद झाला... आपलं नाव दिसत नाही प्लीज सांगावं.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अभिप्राय वाचून आनंदाचा परीघ वाढत चालला आहे...धन्यवाद...राजशेखर जी
Gurunath Deshpande म्हणाले…
निरागस बालक आणि कवीमन.
D M Agnihotri म्हणाले…
नंदू ,झाडात अडकलेल्या पतंगाची आणि बालकाची मानसिक अवस्था तू कवितेतून खूप छान पद्धतीने मांडलीस, दोघेही आधी दुःखी आणि नंतर आनंदी,कविता खूप छान,
Sanjeev Chandorkar म्हणाले…
बालकास पतंग हाती येण्याची हूरहूर आणि या कल्पनेची त्याच्या आई वडिलांच्या प्रेमाशी घातलेली सांगड मन भावून गेली. खूप सुंदर रचना !������
Dr Sushama Khanapurkar म्हणाले…
सुंदर काव्य रचना
तुटलेला पतंग पाहून पतंगाचे आणि छोट्याशा बालकाचे दुःख कवीने जाणले आणि काव्यात नेमकेपणाने मांडले आहे.
Unknown म्हणाले…
अचानक काटले गेल्यामुळे हेलकावत जाणाऱ्या पतंगाप्रमाणे अनेक बालकांचे भावविश्व अचानक हेलकावत जाते...भरकटत जाते हे कवीच्या संवेदनशील मनाने खूप छान टिपले आहे. अर्थात कवितेचे शेवटचे सुखांतीक कडवे मनाला उभारी देणारे....आशावाद जागवणारे आहे
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तू वाचून उत्तम अभिप्राय दिलास,खूप छान वाटलं.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
प्रिय सुनील किती सुंदर अभिप्राय दिलास आणि मला फोन ही केलास असे रसिक चोखंदळ वाचक हेच खूप नवीन लेखनास उर्जा देत असतात.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तुझा अभिप्राय मनास आनंद देवून गेला आणि ब्लॉगवर नोद्वला यामुळे पुन्हा आनंद झाला.
Unknown म्हणाले…
नंदू, तू खरोखरच एक संवेदनशील कवी आहेस. पतंग आणि बालकाचे भावविश्व तू अचूक टिपले आहेस. खूपच सुंदर!
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
जे मनाला भावलं, ते उतरलं गेलं सारी सरस्वती कृपा आहे. मनःपूर्वक धन्यवाद. आपलं नावं इथं दिसत नाही प्लीज सांगावे ही विनंती.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी