अक्षयदान शारदेचे...

 श्री सरस्वती देवी प्रसन्न

आज वसंत पंचमी... . सरस्वती माता जन्मदिन.

३१ऑक्टोबर २००८ रोजी सुचलेली मूळकाव्य कल्पना अक्षर भेट अक्षय दान अक्षर वाटा... आज सरस्वती मातेच्या आशीर्वादाने पूर्णत्वास नेण्याचा एक प्रयत्न केला आहे.



अक्षयदान शारदेचे...

नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तक धारिणी 

आद्य शंकराचार्य म्हणती तू काश्मीरपुर निवासिनी,

ज्ञानदेव म्हणती तू अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी, शारदा विश्वमोहिनी,

नामदेव म्हणती सारजा, चतुराननाची आत्मजा,

एकनाथ म्हणती सारासार विवेकमूर्ती, स्फूर्तीची स्फूर्ती ,अमूर्ताची मूर्ति

तुकाराम म्हणती माउली सारजा

रामदास म्हणती शारदा मूळ चत्वार वाचा, वेदमाता, शब्दमूळ वाग्देवता


लेखणीतून प्रकट होई विविध रूपे लेवूनी 

गद्य-पद्य -कथा, काव्य ,कादंबरी, निबंध, लघुनिबंध 

व्यक्तिचित्रण,चरित्र, ललितलेख, बखर , नाट्याविष्कार

 किती सांगावी तुझीच रूपे ,,,,,


प्रसन्न होता उपासकावरी नेशी अलौकिकात , भरशी मळवट  

अन पाठविशी त्यासीं रसिक दरबारी  


 तू कुठे आहेस हे शोधणे फारच सोपे 

 दोन करांच्या मध्ये वसतीस

 पुस्तकातूनी दाविसी विविध अक्षरवाटा

 नवरसातून तुझा प्रतिभा वाग:विलास


 नमन करतो जो तुला प्रभाती 

 पातो आशिर्वच अक्षयदान.

नंदकिशोर लेले

 nandkishorslele.blogspot.com







टिप्पण्या

S G Deshpande म्हणाले…
खूप सुंदर लेख, तुमच्या ब्लॉगचे नाव सार्थ वाटतं.🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपल्या अभिप्राय आनंद द्विगुणित झाला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी