लता- स्वरज्ञान मूर्ती


आदरणीय लताजी,यांचा आज प्रथम स्मृतिदिन .

 उच्चारिता नाव लता

चक्षु पुढे प्रथम येते स्वरलता


मागील वर्षी त्या देवाघरी गेल्यावर आणि पुढील काही दिवस सारं जनमानस खूप शोकाकूल झालं होतं. त्या काही दिवसात लतादीदींविषयी काव्य ओळी स्फुरत होत्या परंतु काव्य अपुरेच वाटत असल्याने ते ब्लॉगवर लिहिले नव्हते. म्हटलं तर ते अजूनही अपूर्णच आहे असंच ते व्यक्तिमत्त्व.


तरी आज प्रथम स्मृतिदिन या निमितानं ही काव्यशब्दसुमनं त्यांच्या स्मृतीस वाहत आहे . त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा

हा एक झरोका आहे . काही संदर्भ त्या गेलेल्या दिवसाशी आहेत हे कृपया काव्यास्वाद घेताना ध्यानी असू द्यावे ही विनंती.


लता एक स्वर ज्ञानमूर्ती 


गाऊ त्यांची आरती

 जे नित्य देती स्फूर्ती 


जरी लाभला अल्प सहवास पित्याचा

दिला हाती तानपुरा, बंदीशवही आणि गळ्यात गंधार हा समृद्ध वारसा

माईची साथ घेऊनी

 अपार कष्ट करूनी

अखंड स्वर पूजा तू बांधिलीस

झालीस आधारवड सर्व कुटुंबाकरिता

जन्म देऊनी थोर जाहले माता पिता

स्वर संस्कार घडविले आम्हावरी जाणता अजाणता

उंचावलीस ,जागवलीस उदात्त प्रखर राष्ट्रभावना जनमानसा

धन्य जाहली भारत माता


तुजसाठी गीतकार रचती

नवरसाती शब्दरचना

लेवून संगीतकाराच्या मनीची चाल

अमर केलेस तयां अजोड भावमधुर स्वरातूनी

संत वांग्मय भिनविलेस जनरक्तातूनी

उमटता तुझे स्वर सारी स्वरवाद्ये ,तालवाद्ये डुलू लागती

होती अति मंजुळ ,तालमय

आणि श्रोते तन्मय.


दातृत्वाचे हात तुझे

विश्वातील सारं मांगल्य, विनयशीलता

सहजता, ममता सरस्वती रूप

ओसंडते मुखकमलावरी

उदयोन्मुख कलाकारा थाप देण्या पाठीवरी

उजळण्या त्यांच्या गानज्योती


कळता तू अंतर्धान पावलीस

भासे हर एक गीत जणू तुझी स्वर स्वाक्षरी

आज आठवतो, साठवतो ते हृदयांतरी

सारी सृष्टी झाली उदास

वृक्षवेली झाल्या मुक्या, रवी शशीही थबकले क्षणभरी

स्वतः सरसावती त्वरी स्वर्गदारी

अंथरण्या गुलाब पाकळ्या

दिली मानवंदना सूर्य चंद्र प्रभा फाकुनी

परी खिन्न झाले शब्द

शब्दसंपदा असुनी भारी तुझे गुणगान करण्या ती अपुरी ....

मग जुळवूनी कर घालती तुजला उत्प्रेक्षा अलंकार

म्हणती लता सारखी लताच *


मानूनी घे ही काव्य सेवा

करितो नंदकिशोर आर्जव

स्वरज्ञान मूर्ती तवचरणी हे त्रिवार वंदन.


*(लता मंगेशकर यांना कोणतीही उपमा दिली तरी ती अपुरीच आहे. इथे मराठी व्याकरणातील उत्प्रेक्षा अलंकार उदा: ताजमहाल आहे त्याच जगती तोच त्याच्या परी, आई सारखी आईच तसे लता सारखी लताच म्हणणे योग्य ).



टिप्पण्या

Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री आपटे काका अभिप्राय. आपण दिलेला *लता एक स्वर ज्ञान मूर्ती* या कवितेवर
अभिप्राय मला जो स्मरतो तो असा आहे
" लताजींच्या गुणवर्णन यांसाठी उत्प्रेक्षा अलंकार याचा कुणी आतापावेतो वापरल्याचे वाचनात नाही . एकूणच आपला आंतरिक काव्य प्रवास आणि प्रयास यातून दिसून येतो". आपल्याला आठवेल अभिप्राय हे वाचून .जर काही दुरूस्ती असेल ते करुन प्लीज पाठवाल का.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी