द मा मिरासदार श्रद्धांजली

 * ज्येष्ठ विनोदी साहित्यिक आणि कथाकथनकार श्री द मा मिरासदार हे कालच देवाघरी गेले त्यांच्यावर श्रद्धांजली वर दोन शब्द  . *..दमा  विनोदाचा निखळ झरा*           दमा म्हणजे निखळ मिश्किल विनोदाचा अखंड झरा..ग्रामीण भाषेचा योग्य वापर . ते  मूळचे पंढरपूर आमच्या सोलापूर जिल्ह्यातील साहित्यिक. दमा, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या त्रिकूटानं मराठी कथाकथन विश्वात अजोड कामगिरी केली . सर्वसामान्य माणसाला  चार घटका खळाळून हसवून निर्भेळ करमणूक करुत नवसंजीवनी दिली. त्यांचे कथाकथन गणेशउत्सवात व इतरत्र अनेक वेळा ऐकायला  मिळाले हे भाग्यच म्हणावे लागेल.कथाकथन करताना द मा उभे राहले की श्रोते तल्लीन होऊन  सकस एकपात्री अभिनय सहजसुंदर देहबोली अनुभवत  असत. "धोक्याचं वळण" " ड्रॉइंग मास्तरांचा तास" "माझी पहिली चोरी " ही कथा कथनं दमा उच्चारताच लगेचच ओठी येतात. मे  महिन्यातच"ऐसी कळवळ्याची जाती "हे श्रीयुत मिलिंद जोशी यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक मी वाचले होते . त्यात एक साहित्यिक कथाकथनकार आणि प्रेमळ हृदयाचा माणूस असे दमा यांचे व्यक्तीचित्र अतिशय उत्तम रीतीने रेखाटलं आहे.  श्रेष्ठ विनोदी लेखक चिं वि जोशी , श्रीपाद  कृष्ण कोल्हटकर,आचार्य अत्रे , रमेश मंत्री, वि आ बुवा, वसंत सबनीस आदि मान्यवर  विनोदी साहित्यिकांच्या रत्नमाळेत विधात्याच्या इच्छेने  हे रत्न आता गुंफले गेले आहे. हे मान्य करावेच लागेल. मानवी जीवन हा एक पत्त्यांचा डाव मानला तर कधी हलकी तर कधी जड पानं हाती येतात आणि  अशावेळी  उतारी करताना दमा यांच्या विनोदी एक्का मनात ठेवला की सर्वं सोपं होतं आणि दुःख आपली गुलाम होतात.स्वर्गामध्ये आता त्यांची नॉनस्टॉप बॅटिंग सुरू होईल. या थोर प्रतिभावंत  साहित्यिकास विनम्र आदरांजली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी