साजण साद


साजण साद- शब्द रचना ,चाल  आणि आवाज  नंदकिशोर लेले 

 झाली नजरानजर 
 
झाली नजरानजर
 सुरू झालंया नजरबंदी खेळ
 लागलीया जीवा लई हुरहूर
 मनात माजलंया काहूर
 धडधडतय ऊर
  संपता  मुक्काम लातूर

 नाय खातर बारी कवा येनार परतून
 सांगा राया थांबू कशी तवापतूर
 
रानी वारा घालोतय शीळ,
 डुलू लागल्लीया शेंग तूर , 
 वरती पाखरांची भिरभिर ,
 कौल देतीया पापनी
 सख्या सोडू नका अवसर

 सांगू कशी सुटलया आता धीर
 पळून जाऊ आपून दूर
 दिलवरा दिलवरा कसलं करताय इचार

  करु हयो दीड दमडीचा खेळ हद्दपार
 आपलं सपान साकार
 मांडू सुखी संसार
 बिगी बिगी  चल राजा
 नायतर व्हइल निसतं
  कापूर धूर कापूर धूर

टिप्पण्या

S G Deshpande म्हणाले…
लागलीया जीवा हुरहुर
मनात माजलया काहूर खूप
छान ओळी, जिवाची घालमेल अगदी जाणवते. ग्रामीण भाषेचा ढंग अगदी छान जमलाय आता चाल ऐकण्याची हुरहुर लागलीया.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी