रोजमेळ


माझी नवीन कविता  "रोजमेळ" म्हातारपणातील आजाराने त्रस्त वयस्कर माणसं आणि त्यांची सुश्रुषा यात व्यस्त व्यक्तीच्या भावना या कवितेत मांडल्या आहेत।
 " रोजमेळ"     ...

 यातना, याचना आणि यातायात मेळ काही बसेना, 
  संसार दुर्ग पायऱ्या चढता चढता चढवेना,
  देव आणि दैव यातलं अंतर मिटता मिटेना  ।।      
 आधीच चालली होती मोठी परीक्षा , 
त्यात करोना ची सर्वव्यापी शिक्षा, 
समजवितो मना अरे तरी  नाही अग्निपरीक्षा ।  
 प्रखर ग्रीष्मात कोणा पायी वहाणा      
  तर कोणी अनवाणा ।                    
   परि हेच आठवून बळ किती आणू ?               
 प्रभू तुझ्या दारी आलो                
  होवुनी भिकारी येतं  ओठी गाणं  
विनवीतसे विचारतसे   कुलदेवते  माते योगेश्वरी सत्कर्म आणि दुष्कर्म तराजू पारडं   कधी होणार समान  ?    अर्पितो तवचरणी हे काव्यपुष्प (येईल उपयोगी पासंग म्हणूनी)
 हलका होतो ताण मिळतं समाधान।।  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी