मदनबाण

 

मदनबाण




     







येता वसंत ऋतू 

बहरला मदनबाण

उमले सायंसमयी  वा प्रभाती

पाकळ्या असती बहुल 


मोहवी रूप

खिळवून टाकी गंध                 

होतो  धुंद बेधुंद    

अशी नजरबंदी

 दिपती नयन 

जातो मी मोहरून


एकेक पाकळी

 फाकी किरण ऐसें

शोभा रवीची

अन 

शीतलता चंद्राची           

अशी   मुक्तहस्त उधळण         

 अदभूत किमया निसर्गाची    ...


तेवढ्यात

आली कुठून राणी   

मी अचंबित 

गळयात पडले हात

देई खुडून फूल म्हणे

माळ ते हलकेच केसांत 


फुलून आलं प्रेम शहारे रंध्र रंध्रात 

दिवसाच झाली चांद रात

टिप्पण्या

S G Deshpande म्हणाले…
वा वा लेले साहेब, खूप सुंदर कविता,मदन बाण अगदी नेमका लागलाय आणि तो घायाळ ही करतो. कवितेचा शेवट उत्तम दिवसात झाली चांदरात, वरील ओळीत गळ्यात पडले चांदण्यांचे हात, असेही चालले असते ,एकंदरीत कविता सुंदर आणि हळुवार प्रेमाची साक्ष देते आणि जोडीला मदन बाण या फुलाचा फोटो सुद्धा सुगंध पसरवतो.🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्रीकृष्ण जी तुम्ही अगदी लगेच वाचून आस्वाद घेऊन सुंदर अभिप्राय दिलात घरातील आपण लावलेलं झाड किती आनंद देऊन जातं आपण मोहरून जातो आणि मग असं काव्य उमलत धन्यवाद!
Jayant Kale म्हणाले…
एकदम सुंदर आणि मन प्रसन्न करणारे काव्य.👌
सरस्वतीचा आशीर्वाद असाच तुझ्यावर राहो हीच मनोकामना.🙏
अशोक आफळेO म्हणाले…
लेलेसाहेब उत्फुर्त सुचलेली कविता आहे
या फुलांचा सुवास धुंद करणारा असतो
तो क्षण तुम्ही काव्यात छान पकडला आहे कविता अशीच सुचते
अशोक आफळे
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपला अभिप्राय ही सुगंधी असतो.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
जयंत तू लगेच वाचन करून कळवलं आनंद झाला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी