काव्यधून ...


मकरसंक्रांत अंगणात आली असताना  कुर्डुवाडीत  व सोलापूर येथे    लहान असताना रात्री सर्व आवराआवर झाल्यावर  ती.  आजी  व आई  छोटया लोखंडी  शेगडीवर   देखणा  गोड हलवा बनवत असत   याची आज आठवण  येत आहे . त्याच  हलव्याच्या स्नेहातून   उमललेली आणि   काना मनात  ऐकलेली, साठवलेली  काव्यधून ..


//श्री शारदा  देवी प्रसन्न //

Image result for flute


काव्यधून 

कविता म्हणजे सहजता 
जसा खळखळणारा झरा ,
आल्हाददायक  पहाटवारा ,
टपटप पडणारा प्राजक्ताचा  सडा 
पिंपळ  पानांची  सळसळ ,
जाई जुईचा दरवळ ,
पहाटेचे पक्षीगान ,  
पावसाची  रिमझिम
 विजेचा  लपंडाव 
 इंद्रधनूच प्रगटणें ,
थंडीतील धुक्याची चादर ,
सकाळचं   कोवळं ऊन
चैत्रातल टिपूर   चांदणं
पत्नीच आलेलं पहिलं पत्र
पत्नीस घातलेला १ ला गजरा
 लहानग्याचे हास्य  अन   दूड  दूड  पळणं
वृध्द माता पित्याचें पाठीवर फिरणारे ,थरथरणारे हात
आणि डोळ्यातील ओसंडणार वात्सल्य 
कविता म्हणजे सहजता...खूप दिवसाने झालेली  मित्राची  भेट ,
वाड्यातील  शेजाऱ्याची  भेट , 
रसिक हृदयी  भीडणारी  कलाकृती ,
 कानावर  आलेलं  गाईचं  हंबरणं  
 सहजचं  कानी पडणारं  भक्तिगीत , 
देवदारी  ऐकू येणारी अभागी जीवाची करुणामय पुकार ,
देवळातील समईची शांत तेवणारी  ज्योत 
आडवळणांवर  भेटणारी  मानवता ! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी