सद्गुरु








सांसारिक माणसं दैनंदिन होईल तेवढी देवाची उपासना ,आराधना करीत असतात .
सकाळी व संध्याकाळी काही जमलं नाही तरी निदान देवास ,गुरुमाऊलीस नमस्कार हा केलाच जातो.
सद्गुरू हे नित्य साधक/शिष्य यासोबत अदृश्य सावलीप्रमाणे असतात व त्यांच्या पाठबळावरचं सामान्य माणसं दिनक्रम सुरु करतात . हा श्रध्देचा व अनुभूतीचा भाग आहे. अशा सद्गुरुं विषयी कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठीच गुरूपौर्णिमा साजरी केली जाते .... एकदा प्रातःसमयी ब्रह्मचैतन्य गोंदेवलेकर महाराज यांना नमस्कार करीत असता काव्यपंक्ती सुचल्या ... त्या अश्या

सद्गुरु


प्रातःसमयी डोळे भरुनी पाहतो
कर जोडुनी, होऊन तल्लीन
साठवी अंतरी साजिरे रुप
मागतो 'शांती समाधान 'माधुकरी दिन भरासाठी

सायंसमयी साद पुन्हा घालितो
चरणी ठेवून माथा...
क्षणार्धी कसा दिनभरचा जाई क्षीण
न कळे आम्हा नाथा ...

सद्गुरू समर्थ कृपेचा सागर
शिष्या देई साथ निरंतर, होवूनी नौका
पार कराया दुस्तर भवसागर !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण