वारकरी ...






वारकरी ... 

आषाढ आणि कार्तिक  महीना व पंढरीची वारी हे  समीकरण  अगदी बालपणापासून साऱ्या महाराष्ट्राच्या जना  मनात घट्ट रुजलेलं  आहे . देवाशी एकरुप होणं याला तल्लीनता  लागते  व ती समूहरूपात वारीत आपण पाहतो , अनुभवतो.

साहित्यसेवा तसेच विविध कला माध्यमातून माणसाचं व्यक्त होणं यातही एक प्रकारची तल्लीनता असते,तादात्म्य असतं. एक आत्मानंद मिळत असतो. कवी, लेखक अथवा कलाकार हा कलेमध्ये नेहमीच मशगुल असतो. बाह्य जगात जरी तो वावरत असला तरी अंतर्मनात एक प्रकारची प्रक्रिया अनुभव घेणं , टिपणं आणि अवलोकन सुरू असतं . तो साहित्य पंढरीचा अथवा कला पंढरीचा एक वारकरीच असतो. सगळीकडे राम कृष्ण हरि पांडुरंग हरि असा  विठुरायाचा गजर सुरू असताना  मनी आलेले भाव  या कवितेत शब्दबद्ध केले आहेत.


चंद्र चांदण्यात 
विहंग गगनात 
मत्स्य पाण्यात 
चाल गाण्यात   
घुंगरू पायात 
 नाद वेणूत  
गंध सुमनात 
 मध फुलात
गृहिणी  संसारात 
बाळ  पाळण्यांत 
ममता  माय  ह्रद्यात 
शेतकरी शेतात, कामकरी  कामात  
जीवनचक्र अव्याहत 
शोधी  काव्य जीवनात  
जसा वारकरी सदा पंढरपूरात !


टिप्पण्या

Mahesh Lele म्हणाले…
खुपच छान लिहिले आहे नंदू
भक्ती कशी असावी , दिनचर्या नामस्मरण आणि आचरण.... 👍🏻👍🏻🌷🌷🙏🏻
Unknown म्हणाले…
आपल्या विहित कार्यातील तल्लीनता, एकरूपता ही देखील एक प्रकारची वारी आहे.
वारी द्वारा दिल्या जाणार्‍या अनेक संदेशांच्या मध्ये हा देखील मोलाचा संदेश आहे.
नंदूने तो अचूक पणे आपल्या काव्यातून व्यक्त केला आहे
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
शेखर तू लगेचच वाचून अभिप्राय दिलास आनंदाचा परीघ वाढला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी