मला भावलेले ‘’ भावे साहेब “

मला भावलेले ‘’ भावे साहेब “


ऐ एस भावे अशी चटकन लक्षात येणारी  फोर्ट मुंबई शाखेकडून GA 72 वरील TT पाठविल्याची  इग्रजी सही हिच माझी व साहेबाची अप्रत्यक्ष ओळखं इचलकरंजी मुख्य शाखेकडे असताना १९८२-८३ साली श्री ओळकर साहेबांनी करून दिलेली. या शाखेकडे दररोज एकतरी व  काही प्रसंगी दोनवेळाही TT Sent Rs. Ten lakh  - Bhave असा telegram येत असे. नंतर सातारा येथे काम करत असताना सातारा  प्रादेशिक कार्यालायाकडून कडून येणारी बहुतांशी पत्रावर  त्यांचीच सही असायची  हे पाहिलेले आहे. सातारा येथे आल्यावर हे व्यक्तिमत्व कळू लागले. कामावरील निष्टा, सचोटी ,कडक पण संयमित स्वभाव व व्यक्तिगत हितापेक्षाही संस्थेच्या हिताची जपणूक, मृदू बोलणे व विनोद झाला असता खळी पडत असलेले हास्य आजही डोळयासमोर उभे राहते.
सातारा येथील चिरमुले  निकेतन हि United वेस्टर्न बँके असलेली इमारत “दगडी बँक”- (Bank having sound Foundation)  म्हणुन ओळखली जात असे . अशा बँकेस भरभक्कम करण्यात श्री. भावे साहेबासारख्या व्यक्तीचाच  फार मोठा वाटा होता. १९९६-९७ साली computer क्लासला D R साहेब,  ठकार साहेब व आमचा C&IC चा चमू अशी सकाळी ६ महिने त्याचं नित्य गाठ पडत असे. अतिशय कमी परंतु मार्मिक असें त्यांचे बोळणे असे. आपण सर्वचजण office मध्ये काम करीत असताना अनेक उच्चपदस्थ आधिकारी, सहयोगी कर्मचारी बंधूशी आपला सहवास येतो परंतु त्यातील निवडक व्यक्तीचं आपल्याला जास्त /प्रकर्षाने स्मरणात राहतात भले त्यांचा आपला कामानिमित्त कमी संबंध आला असो व ते त्यांच्या विशेष कार्यशेलीमुळेच असते. बॅंकेत पेन्श्न लागू होण्यासाठी त्यांनी खूपच कष्ट घेतलें कि ज्यामुळे आज अनेक जण त्यांचे आयुष्य आनंदात जगत आहेत. भावेसाहेबांची शरीरयष्ठी तशी strong होती पण मध्यांतरी आजारात ते न ओळखता येईल इतके बारीक झाले होते. अंदाजे दोन एक वर्षपूर्वी त्यांची श्री Bondale मुलाच्या विवाहात व निवृत्त धारकांच्या सभेतगाठ पडली होती. एखाद्या झाडाची उंची तो उन्मळून पडल्यावरच  खरी मोजता येते. त्यांच्या कुटुंबीयांना हे दु;ख सहन करण्याची शक्ती परमात्मा देवो हिच प्राथर्ना !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी