तुझ्यासम तूच.....


 II  श्री गणेश प्रसन्न II  
II  श्री शारदा माता प्रसन्न II  

शारदा माता ही वाणीची देवता आहे .
समर्थ रामदास श्रीमत दासबॊधामध्ये  दशक पहिला  समास तिसरा यात  लिहितात

 II  श्रीराम  II  आतां वंदीन वेदमाता  श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता I  माहं माया  II१II  
जे उठती शब्दांकुर I वदे वैखरी अपार  I  जे शब्दाचें   अभ्यांतर   उकलून दावी II२ II  

तर अशी ही शारदा उपासकावर प्रसन्न झाली की काव्य सुचते.   कविता हा  शारदेच्या  साहित्य दरबारातील एक अविष्कार आहे . या कवितेच्या ओळीतून मी तिचे बाह्यरूप व अंतरंग रेखटण्याचा  प्रयत्न केला आहे. 

तुझ्यासम तूच..... 

कशी  असते कविता
अशी  असते कविता .... 
अर्थगर्भाने भरलेली,
सुख दुःखाचं वस्त्र ल्यालेली,
भाळी शब्दगंधाचा  टिळा , 
भाषा -अलंकार परिधान  केलेली ,
नित्य नूतन रूप धारण करणारी ,

धरती  आकाशाच  नातं जोडणारी ,
जनमानसाची, रसिकांची साहित्य लालसा जोपासणारी ,
रसिक दरबारी येण्यास आसुसलेली ,
स्वरांना लोभविणारी,
फुलांना सुगंधाविणारी ,

आत्मभान जागविणारी ,
कार्यप्रवृत्त , कार्यमग्न करणारी ,
विश्वातील सर्व सुंदरता प्रगटणारी ,
निर्लेप  मनाची ,निरपेक्षतेची  साक्ष देणारी 
अगदी without obligation अशी वाटणारी 
आणि  obligation  मध्ये टाकणारी
अनादी अनंत  ..... 
तुझ्यासम तूच...   तुझ्यासम तूच ... 







टिप्पण्या

Shrikant Lele म्हणाले…
Very good!! Congratulations Nandu! This is a perfect canvas
to pen down your thoughts!
Mahesh Lele म्हणाले…
खूपच छान ...
sunita pimprikar म्हणाले…
खूपच छान ब्लॉग!
अनिल पाठक म्हणाले…
अभिनंदन नंदु, खूप छान!!
पराग लेले म्हणाले…
तुझ्यासम तूच खुप छान!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी