शब्दांची आरास .....

// श्री शारदा देवी प्रसन्न //

शब्दांची आरास .....

मांडली शब्दांची आरास तव पूजेस्तव, होऊनी सर्व कवीगण उपस्थित
शब्द हेचि भाव, शब्द हेचि गंध
शब्द हेचि फुले शब्दांचाच घंटानाद
शब्दांचेच निरांजन तुला ओवाळण्या
एका पूजा अशीही की प्रसाद प्रथम अन पूजा नंतर
साधन अन साध्य यात न उरले अंतर
काव्य जन्मले हा शारदे तुझा प्रसाद
आता ही अशीच शब्द पूजा ,शब्द माला
अखंड बांधितो मी ,आनंदात राहतो मी तुझिया कृपेने
शब्दा शब्दात भरून , तू राहिलीस तरीही उरून
असे अखंड अगाध अक्षय पात्र ,जो जो करितो साहित्यसेवा तो तो यास पात्र
नमितो नंदकिशोर शारदे माते अर्पितो तव चरणी हे शारदा स्तवन...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी