कवितेच्या अंगणात - पुस्तकातील खूण



कवितेच्या अंगणात - 

कवितेचा आनंद आपण अगदी बालपणापासून घेत असतो.आईच  बाळाचे जसं चिरंतन नातं असतं, तसंच  कवितेचे  आपलं नातं ही चिरंतन असतंलडिवाळ  अशा  अंगाई गीतातून ती प्रथम आपल्या अंतरात प्रवेश   करते.लहानपणी  बडबड गीत,   पाठ्यपुस्तकातील कवितापहाटवेळी ऐकू येणारी भक्तीगीतेभूपाळी,   अभंग अशा रूपातून ती भेटत राहते तर प्रौढपणी वृत्तपत्रांची रविवार पुरवणीदिवाळी  अंकातील कविता,   काव्यसंग्रह तसेच काव्य संमेलन यातून आपली  कवितेची मैत्री वाढत जाते.  

"फिरे रात्रंदिनी अवनी सुखदुःख भिडे  हृदयीउसंत मिळता अवतरे कागदावरी या प्रक्रियेतून कवी व्यक्त होत राहतोआसपासचा   सुखदुःखाच्या विविध  अनुभव छटा , मानवी भावभावनांचा खेळनिसर्गातील आविष्कार  कधी  स्वानुभव  तर  कधी परकाया प्रवेश असं सर्व काही कवितेतून उमटत जातं. 

जसं घरासमोरील अंगणात अथवा गच्चीत आल्यावरच आपण चांदण्यांच खरं रूप नीट न्याहाळू शकतो आणि मग शरदाचं चांदणं  आणि चैत्रातील  चांदणं  यातील भेदही  आपण अनुभवु शकतो. तद्वतच कवितांच्या मनन व चिंतनातून आपण कवितेतील शब्द आणि भाव याचा मागोवा घेत जातो. काही कवितां गाणं म्हणून   आपणासमोर येतात उदा जेष्ठ कवी भा.रा.तांबे यांच्या बहुतांशी कवितांना प्रतिभावंत संगीतकारांनी उत्तम चाली दिल्या गेल्या व त्यांची गाणी झाली - तिन्ही सांजा सखे मिळाल्या,जन पळभर म्हणती हाय हाय तर बालकवी ठोंबरे याची श्रावण मानसी हर्ष मानसी  हिरवळ दाटे चोहींकडे अथवा आनंदी आनंद गडे ही कविता प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर वसलेली आहे. ह्या कविता  ऐकतांना  वाचतांना  जणू कवितारूपी  अंगणातच आपण शब्द सूर व भाव यातून न्हावून निघतो. अशाच काही कवितांचा रसास्वाद आपण कवितेच्या अंगणात  या सदरातून घेणार आहोत.  

पुस्तकातील खूण

या लेखात समान आशय धर्माच्या दोन प्रेमकवितांचा रसास्वाद घ्यायचा प्रयत्न केला आहे.  एक कविता  देता घेता  ही ज्येष्ठ कवियत्री इंदिरा संत यांची आहे तर दुसरी कविता पुस्तकातील खूण आचार्य प्रकेअत्रे 
यांची आहे.प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी यांनी इंदिरा संत यांच्या ''देताघेता'' या कवितेचे सुरेल गायन केले आहे आणि त्यातूनच या लेखाची बीजे मला मिळाली  आहेत

या दोन्ही कविता मध्ये पुस्तकातील खूण हा समान धागा आहे . प्रियकर आणि प्रेयसी यांचे तरल भावविश्व यात प्रकट झालं आहे .ज्याप्रमाणे नदी अथवा तलावात पाण्यावरील तरंग अतिशय संथपणे परंतु एका लयीत उमटत असतात तद्वतच प्रेमिकांच्या प्रेमातही एक लयबद्धता असते. प्रेम या अडीच अक्षराची जादू काही औरच आहे प्रेम हे एक अजब रसायन आहे. वाऱ्याच्या झुळूकेतील हळुवारळपणा, फुलातील सुगंध कोमलता, सूर्याची संजीवकता, चंद्राची शीतलता, सागराची अथांगता, आकाशाचे विशालपण , विहंगाचे स्वैरपण, वीराचे सामर्थ्य आणि समर्पण भावना ही सर्व रूपे हे प्रेमाचे विविध  अविष्कार  आहेत.  रूपे थोडक्यात विश्वातील सर्व सुंदरता भव्यता प्रेम या एकाच शब्दात एकवटलेली असते. काळाच्या आवश्यकतेनुसार हे प्रेमाचे अविष्कार व्यक्त अव्यक्त स्वरूपात प्रकट होतात.

 पुस्तकातील खूण या कवितेतील

 दिवस झाले त्याजला किती आता

 सहज पुस्तक ये आज तेच हाता

 केवड्याची त्यातील बघू खूण

 सुखा स्मृतीने मन जात गहिवरून

 या ओळी तर देताघेता या कवितेतील

 असेच काही द्यावे घ्यावे

दिला एकदा ताजा मरवा

 देताघेता त्यात मिसळला गंध मनातून का त्यांहून हि रवा

या ळी प्रेमाच्या चिरंतनतेची साक्ष देतात . केवडा मरवा या दोन्ही वनस्पतींची पाने अतिशय आल्हाददायक सुगंधी असतात  उपरोक्त कवितांच्या कडव्यांमध्ये याचा उल्लेख आढळतो.  प्रेमातील धुंदता, गंधित होऊन जाणं  यातून व्यक्त होतं. या दोन्ही कविता कमालीच्या चित्रदर्शी आहेत

पुरे गोष्टी वाचणे करा गोष्टी

म्हणे फीरवा हिरवा वर दृष्टी

क्षण शीर काढून तिने पात

 केवढ्याची घातली पुस्तकात

(पुस्तकातील खूण या कवितेतील कडवे)

 पुस्तकातील खूण कराया

दिले एकदा पीस पांढरे

पिसाहुनि सुकुमार कांहिसे

 देताघेता हात थरारे

(देताघेता या कवितेतील कडवे)

या दोन्ही कडव्यातून प्रेमिकांचा आवेग दर्शविला आहे.दोन्ही कवितांमध्ये यमकांचा उपयोग प्रेमाचे गमक सोडवण्यात झाला आहे .

लौकिक अर्थ पाहता पुस्तकातील खूण ही वाचन कुठपर्यंत आले आहे याची निदर्शक असते परंतु दोन्ही कवितांमध्ये पुस्तकातील खूण ही अलौकिक आठवणींची खूण आहे. देता घेता या कवितेत पांढर पीस,     शिंपला ,मरवा अशा प्रेम खुणांचा उल्लेख झाला असून आचार्य अत्रे यांच्या कवितेत केवडा ही प्रेमखू आहे. आपणापैकी प्रत्येकास लहानपणी रंगीबेरंगी खडे शंख शिंपले रंगीत काचा, खोडरबर चॉकलेट चांदी, मोरपीस इत्यादी वस्तू जमवण्याचा छंद असतो, या वस्तू जपण्यासाठी पुस्तक वही कंपास पेटी चॉकलेट चा डबा याचा उपयोग केला जातो. अगदी सुगंधित फुलांच्या पाकळ्या ही पुस्तकात/ वहीत जपून ठेवल्या जातात त्यांचा अधून मधून वेळ मिळाल्यावर पुन्हा पुन्हा बघण्याचा कधी होऊन हुंगणे /वास घेणे असा आनंदही काही औरच असतो. अपुलाच आपणांसी संवाद असा घडत असतो. तरुणपणी मात्र यातील काही वस्तूंचा     उपयोग प्रेमखुणां म्हणून जीवनगाठ बांधण्यासाठी केला जातो.वरील कवितांमध्ये याच अर्थाने पुस्तकातील खूण उल्लेखली आहे . काही भाग्यवान प्रेमीक या प्रेमखुणांतूनच जीवनसाथी होतात. अशा यशस्वी प्रेमयुगलांचा विवाह झाल्यावर दैनंदिन जीवनक्रमात या प्रेमखुणांचा तात्कालिक विसर पडतो परंतु कधी काळी निवांत वेळ मिळाला असता कपाटातील पुस्तके बघताना, घराची आवराआवर करताना अशा प्रेमखुणां पुन्हा हाती लागतात व मग  क्षणार्धातच  काळाचा पडदा अलगद दूर होतो  आणि त्यावेळचं प्रणय चित्र नय पटलावर सजीव पणे उभे राहतं , आनंदाला पारावर राहत नाही, अंगावर रोमांच उठतात मनाचा मोर पिसारा फुलू लागतो. कवितेतील खालील ओळी हेच चित्र डोळ्यापुढे उभे करतात

"' मेजावरचे वजन छानसे म्हणुन दिला नाजूक शिंपला"'

" देतां घेतां उमटे काही मिना तयाचा त्यावर जडला'

" फिरून फिरून उघडी तो तेच पान आणि प्रेमे हुंगीतो तीच खूण "

 या ओळी प्रेमिकांची  उत्कट भावावस्था वर्णन करतात आणि साध्या शब्दातून प्रेमाचे गहिरेपणही उलगडून दाखवतात तर अशीही पुस्तकातील खूण अंतरा मधील अंतर दूर करते प्रेमिकांना पुन्हा स्मरणगंधाचा अनुभव देते आणि प्रेमिक सहजच हिंदोळ्यावर स्वार  होतात....ऐकुया गाणं



https://www.youtube.com/watch?v=_ploiJp8yiQ



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी