मनमोर ....

 

मनमोर ....

सकाळचे सात वाजले होते आजी आजोबा हॉलमध्ये चहा पीत बसले होते. आजोबांचा चहा झाला आणि ते पटकन उठले आणि कॅलेंडरचं पान बदलून जून महिना आणला....

आजी: किती उकडतय ना... आजी पुटपुटली

आजोबा :काल पाऊस पडला की

आजी: वळवाचा पाऊस होता तो ...पावसाळा ७ जूनलाच सुरु होतो

आजोबा: अग ऋतुचक्र बदलय सारं .....

आजी: यावर्षी पाऊस नॉर्मल आहे बरं का ....कालच बातम्यात सांगितलं

आजी-आजोबांचा संवाद सुरू होता तेवढ्यात ' नाच रे मोरा आंब्याच्या वनात' रेडीओवर गाणं लागलं ... सुहास ते ऐकण्यात तल्लीन झाला होता आणि चहाचा घोट घेणं सुरू होतं एवढ्यात छोटी मनू उठून आजीला येऊन बिलगली ... म्हणाली... आजी गं या वर्षी तरी तु मोर दाखवणार ना नक्की खराखुरा... मोबाईल मधला नकोय मला...

आजी: हो ग मने.. नक्की दाखवणार. मोराच्या चिंचोलीला घेऊन जाणार आहे मी तुला...आजीने प्रश्नार्थक चेहऱ्याने आजोबांकडे पाहिलं. आजोबा उठले.. . पटकन मोठा पांढरा कागद आणि पेन्सिल घेऊन आले आणि सुंदर नाचणाऱ्या मोर लांडोर जोडीचं चित्र काढलं ...मनू पटकन रंगीबेरंगी पेस्टल कलर घेऊन आली आणि मोराचा पिसारा हा हा म्हणता रंगवला गेला.. मनू हरखून गेली आणि आजोबांच्या मांडीवर जाऊन बसली सुहास हे सारं गाणं ऐकता ऐकताच कुतुहलानं  बघत होता.. आजीचे डोळे मात्र पाणावले होते .

तेवढ्यात बेसिन मधील पाण्याचा आवाज आला पल्लवी उठली होती. गेले दोन दिवस रात्री बराच वेळ ऑनलाईन ऑफिस काम करण्यात तिला झोपायला खूप उशीर होत होता. आजी आजोबा मनू आणि सुहास यांचं हसणं खिदळणं बघून पल्लवी हॉलमध्ये आली. रंगवलेला मोर बघून तीही खूप आनंदून गेली. सकाळच्या ऊनाचा कवडसा सोफ्यावर पडला होता . पल्लवीच्या मनात विचार येऊन गेला सुहासला सांगू आपण आता नगर चे घर भाड्याने देऊन टाका ; आजी आजोबा येथेच राहू देत. कितीदा सांगितलं तरी ऐकत नाहीत आणि सुहासला तर काळजी असतेच त्यांची. मार्चमध्येच आजी आजोबा सुमीच्या लग्नासाठी पुण्याला आले होते आणि Lockdown जाहीर झाल्यामुळे आता ते इतक्यात नगरला जाऊ शकत नव्हते.आजी पटकन उठली आणि तिने पल्लवी साठी कॉफी करून आणली.पल्लवीच्या हातात कॉफी देत आजी म्हणाली -खूप दमतेस हल्ली तू आता विश्रांती घे; तुझं हा सगळा online ऑफिस गोंधळसंपेपर्यंत सगळा स्वयंपाक मीच करणार आहे. रेडिओवर पुढचं गाणं लागलं होतं ....हरवले ते गवसले का .... एवढ्यात दारावर बेल वाजली आजोबांनी मनूला उचलं आणि दरवाजा उघडला.. कोणीच नव्हते...   दारावरील पिशवीत दूध आलं होतं आणि शेजारच्या गॅलरीतून मनी माऊ त्या दुधाच्या पिशवी कडे टक लावून बघत होती... मनू आजोबांना म्हणाली आता हे चित्र काढूया का आजोबा आपण... आजोबांनी मनूचा गोड पापा घेतला ...त्यांच्याही मनात विचार येऊन गेला आता सुहास कडेच कायम राह्यचं. एका मोरानं साऱ्यांना एकत्र आणलं होतं मूक घर बोलकं झालं होतं......



टिप्पण्या

Unknown म्हणाले…
सुंदर कथा आहे
Shrikant Lele म्हणाले…
आत्ताच वाचला.. हे वाचून अलिकडील विभक्त कुटुंबातील सदस्यांच्या मनी 'ये दिल मांगे मोर' अशीच भावना निर्माण होईल !!!
Shriniwas Madhavrao Vaidya म्हणाले…
कोरोनाने दोन पिढ्यांना जवळ आणलं. तिसरी पिढी जोडणारी झाली. कौटुंबिक जिवनासाठी आज जे आवश्यक आहे ते या कथेने अधोरेखित केले आहे. कळत नकळत. लघु कथा जरी वाटली तरी दिर्घ संदेश देणारी आहे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
लेखक सांगत असतो आणि रसिक ते लिखाण अधिक उन्नत करत जातात.अवि एक लेखक आणि प्रामुख्यानं पत्रकार पिंड घेऊनच जन्मला असल्यानं त्याची नजर,नाही नजरिया हा किती वेगळा असतो हे अभिप्रायातून दिसून येतं.छान वाटलं अवि....
Jayant Kale म्हणाले…
खरंच, एकत्र आणि विभक्त कुटुंब पध्दतीवरील संदेश फारच छान, दिलासा देणारा आहे.
उत्तम लेखनशैली.👌
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
जयंता... आनंदीत झाले कथेतील पात्रे आणि आपण...
अत्यन्त हृदयस्पर्शी लिहितोस नंदू. खूप छान लिहिले आहेस खूप हसरे खेळते एकत्र कुटुंब बघायला मिळणं ही आजकाल दुर्मिळ अशी गोष्ट झाली आहे. नातीच्या संगतीत आपण जर वय विसरून तिच्या मनाप्रमाणे आपण थोडासा तरी वेळ दिला तर तिला टीव्ही मोबाइल गेम्स याची आठवण देखील येत नाही व अशा नातवंडां बरोबर खेळताना आपला वेळ सुद्धा जाऊन त्यांच्या चेहऱयावरिल हास्य व समाधान हे आपल्याला नवीन ऊर्जा देणारे ठरते. तूला स्फुरलेल्या कथेत नातवंड व आजोबा, सासू व सून, बाप व मुलगा, आणि स्नेहाच्या संबंधांच्या आड येणारी प्रॉपर्टी यांचा सुरेख आणि जीवन आनंदी करू शकणारे वातावरण निर्माण करणे हे ज्याच्या हातात च असते हा गूढ अर्थ नकळत सांगून गेला. या छोट्या लिखाणाच्या गुहेत कुणी अधिक विचार केला तर या पार्श्वभूमी वरून मोठी कादंबरी सुद्धा जन्माला घालण्याचा एक अंकुर तुझ्या या लिखाणात दिसून आला. खूप खूप अभिनंदन व तुझ्यातल्या श्री सरस्वती देवीला वंदन
विजय रणसिंग म्हणाले…
नंदकिशोर लेले जीं खूप सुंदर हृदयाला स्पर्श करणारी लघुकथा तुम्ही लिहिली आहे. नौकरी व्यवसायासाठी लग्नानंतर कुटुंबीय मुले मुली विखुरली जातात पण नातेबंध टिकतात, ओढ रहाते ती नातवंडंच्या मुळेच. लघुकथा हा खूप सुंदर साहित्य प्रकार आहे. अत्यंत कमी शब्द वाक्यात कथा अधिकाधिक कशी प्रभावी लिहिता येईल हे लेखकाचे अदभूत कौशल्य असते आणि तुम्हाला ते छान जमले आहे. लिहीत रहा
Anant Kulkarni म्हणाले…
Respected Sir,

I read the entire story very carefully.It is very heart touching.It throws light on the importance of joint family.
Sir,your observation of the behaviour of different characters is very cute,subtle and psychologically well based.
If the elder in the family keep themselves away from so called ego and prestige,if they forgive for so called mistakes or blunders the next generation,home will be the paradise to each and every member of the family.

It is universal truth that after the age of 50 ,any man can take any type of meaning of any type of behaviour which even the next generation never think of!!!

May God shower on the author more and more opportunities to write in the various forms of literature to preach the importance of different types of universal truths in a way or the other!!!

I again wish Mr.Leleji for his role of author to make his as well as the lfe of his readers colourful and cheerful,interesting and enthusiastic!!!

Anant Kulkarni
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपला अभिप्राय खूपच मनस्वी आहे.ही कथा लिहिताना झालेला आनंद ,कथा पूर्ण झाल्यावर पाठवताना झालेला आनंद आणि सुजाण रसिक वाचक यांच्या अभिप्राय यानं झालेला आनंद यांनी आनंदाचं वर्तुळ मोठंच होत आहे.धन्यवाद श्री विजयजी.







Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री AV आपल्या अतिशय सविस्तर आणि भावपूर्ण अभिप्रायानं मन आनंदून गेले. आपल्या शुभेच्छा माझ्या लेखन प्रवासात खूप मूल्यवान आहेत. खूप धन्यवाद .
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
हरि अतिशय आनंद झाला
तुझ्या या अभिप्रायरुपी पाठीवरील थापेने. आपण कॉलेजपासून मित्र असल्याने एक वेगळचं असं आपलं नातं आहे,असंच ते फुलवत ठेऊया.
Unknown म्हणाले…
काका,कथालेखन चांगले झाले आहे. एक छान कुटुंब रंगवलं आहे. थोडक्या शब्दात छान गोष्ट सांगितली आहे. गोष्टीचा शेवट झाल्यावर असं वाटतं.,अरे गोष्ट संपली पण.😊
Unknown म्हणाले…
खूप छान लिहीली आहे कथा .आजकालचं दुर्मीळ असं हसतं खेळतं एकञ कुटुंब एका लघुकथेच्या माध्यमातून खूप सुरेख पध्दतीने रेखाटले आहे. कथेतील पाञे वाचतानाच डोळ्यापुढे उभी रहातात .यापुढेही अशाच छान छान कथा लिहा.
Raja म्हणाले…
नंदकिशोर......
लघुकथा छानच लिहिली आहेस.....आज वाचली.....
आदर्शवत वाटणारी पण मृगजळा प्रमाणे हुलकावणी देणारी परिस्थिती आहे.....सर्वांच्या मनात आहे पण आचरणात येत नाही.....कारण काही असो....बऱ्याच वेळा परिस्थितीच अशी असते की आपण काही करू शकत नाही.....त्यामुळे एक आशेचा किरण तुझ्या कथेत दिसतो..... काश....खरेच असे घडावे.......आमेन.....🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण वाचून अभिप्राय दिलात, आनंद द्विगुणित झाला.इथं आपलं नावं दिसत नाही ते please लिहा.
sunita pimprikar म्हणाले…
अतिशय सुंदर!
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपल्या या अभिप्रायानेआनंदाचा परीघ वाढला. धन्यवाद.
Unknown म्हणाले…
सौ.वंदना अरविंद माळी,सातारा.
Unknown म्हणाले…
सौ.वंदना अरविंद माळी, सातारा.
Unknown म्हणाले…
नंदकिशोर. आज कथा वाचली. खूप छान, डोळ्यासमोर व्यक्तिरेखा उभ्या रहातात. त्यामुळे तूम्ही एकांकिका लिहू शकाल. मी तरी कथा लिहून मग नाट्य तयार करतो. कथाबीज महत्वाचे. ते तूम्हाला सुंदर जमले आहे.
उत्तर द्यायला उशीर झाला. या बद्दल दिलगीर आहे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
काका, आपल्या पाठीवरील हात खूप मोलाचा आहे.कथा प्रांतात मी प्रथमच प्रवेश करतो आहे .या कथेतून आपण एकांकिका लिहण्या विषयी व्यक्त केलेल्या अपेक्षा सार्थ करण्यासाठी मी जरूर ते कष्ट घेईन, आपले मार्गदर्शन आहेच.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपल्याला अभिप्राय बद्दल आभारी आहे.माझ्या ब्लॉगबाबत तुम्हाला कसे कळले ते कळवाल का
Unknown म्हणाले…
माझी बहीण सौ.रंजना रत्नाकर शिंदे यांनी व्हाॅटस ॲप द्वारे मला ही कथा पाठवली होती.
Manisha Mehendale म्हणाले…
नंदूदादा 🙏

निमित्त मोराच्या चित्राचे....

एकाचवेळी सगळ्यांच्याच मनात एकच विचार येणे हिच तर आहे मायेच्या,आपुलकीच्या,प्रेमाची किमया....

हे रेशमी बंध अखेर सगळ्यांना एकत्र बांधून आनंद निर्माण करते हा सुखांत अधिक भावला...

संयुक्त कुटुंबातील नात्यांचा ओलावा स्पष्ट दिसला...

खूप छान ......
Manisha Mehendale म्हणाले…
नंदूदादा🙏

निमित्त मोराच्या चित्राचे....

एकाचवेळी सगळ्यांच्या मनात एकच विचार येणे हीच तर आहे मायेची,आपुलकिची ,प्रेमाची किमया...

संयुक्त कुटुंबातील नात्याचा ओलावा छान व्यक्त केला आहे...

सुखांत केल्यामुळे लघुकथा अधिक भावली...

खूप छान...👍👌
Manisha Mehendale म्हणाले…
नंदूदादा🙏

निमित्त मोराच्या चित्राचे....

एकाचवेळी सगळ्यांच्या मनात एकच विचार येणे हीच तर आहे मायेची,आपुलकिची ,प्रेमाची किमया...

संयुक्त कुटुंबातील नात्याचा ओलावा छान व्यक्त केला आहे...

सुखांत केल्यामुळे लघुकथा अधिक भावली...

खूप छान...👍👌
Unknown म्हणाले…
वा, वा! खूपच छान . ओघवत्या भाषेमध्ये आजी, आजोबा आणि नातवंडाचा संवाद लघुकथेच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे सादर केला आहे . खरचं एका मोरानं मूक घर बोलतं केले . प्रसंग साधाच पण मांडणी करण्याच्या कौशल्याने कथेला एका विशिष्ट उंचीवर आपण नेऊन ठेवले आहे. खूपच छान . असच यापुढे वाचायला मिळो ही अपेक्षा .🌹🌹🙏🙏
Unknown म्हणाले…
वा, वा! खूपच छान . ओघवत्या भाषेमध्ये आजी, आजोबा आणि नातवंडाचा संवाद लघुकथेच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे सादर केला आहे . खरचं एका मोरानं मूक घर बोलतं केले . प्रसंग साधाच पण मांडणी करण्याच्या कौशल्याने कथेला एका विशिष्ट उंचीवर आपण नेऊन ठेवले आहे. खूपच छान . असच यापुढे वाचायला मिळो ही अपेक्षा .🌹🌹🙏🙏
Sneha desai म्हणाले…
सुरेख! ही लघुकथा एक विचार देणारी मेसेज देणारी आहे. साधासा विषय, सोपे शब्द लघुकथा मात्र आशयघन झाली आहे. खूप छान! 🙏🙂🙂
Sneha desai म्हणाले…
दोनतीन दिवसापूर्वी मी appreciate केलं होतं. कसं आलं नाही इथे, काय माहीत? असो.
लघुकथा सुरेखच आहे. साधासा विषय व सोपे शब्द घेतले पण लेखनशैलीने हा writeup कुठेच्या कुठे अप्रतिम झाला आहे. असो.
खूप शुभेच्छा. 🙏🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सौ स्नेहा-नमस्कार आपण सोलापूर मित्र मंडळी तुझे सर्व अभिप्राय वाचून खूप आनंद झाला...तु ही लिहित असशीलच..ते पाठव मला. ब्लॉग comments इथे काही बदल केले आहेत..गूगलने म्हणून अभिप्राय दिसत नव्हते .आज reset झालं. अभयशी बोलीन.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी