जीवन म्हणजे एक नाणं


उंबरठ्यावर दीपोत्सव असताना  अंतर्मनातील  ज्योत पुन्हा एकदा अधिक जागृत करूया म्हणून ही कविता ..
  

जीवन म्हणजे एक नाणं 

जीवन म्हणजे एक नाणं  
प्रारब्ध व कर्म बाजू दोन या नाण्याच्या .. 
कधी प्रारब्ध उजळविणारे 
तर कधी काजळविणारे 
जयाच्या हाती प्रारब्धाची  ज्योत 
तयाने पसरावा अधिक प्रकाश 
जयाच्या हाती प्रारब्धाची  वात
तयाने कर्माने  प्रज्वलित करावी ,फुलवावी वातीची ज्योत 
हाच संदेश प्रत्येक जन्माचा
ज्याचा त्याने उमजून घेण्याचा 
शिरीं घेता संत गाथा 
नाणं चालतं हमखास , अगदी विनासायास 
अन समजतं सुख दुःख हे फक्त भास आभास ....  भास आभास ...


काव्य ३ मे २०१२ रोजी पहाटे  ५. ५० ला सुचलं ..  होतं 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी