सरगम.......

सरगम .......
सहज पाही तुला एकदा मी दर्पणी
छेडली  तार, उमटले सूर
विराजली तू माझ्या हृदयसिंहासनी
रूपगंधा म्हणू की मोहिनी,
सुहासिनी म्हणू की पद्मिनी
मृगनयनी म्हणू की हंसीनी
गमे भासे दिसे न कळे काय जाहले मजला
गेलो की मी पुरता  वेडा होऊनी...

सारेच किती पाहू आता छायाचित्रांतूनी ....
पुरे झाले आता येणे हे स्वप्नी 
रूपके किती साठवू नयनी , उरी  अंतरी
सत्यात अवतरू दे सरगम सत्वरी...





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण