विनवणी

विनवणी
सरस्वती  माते हात ठेव शिरी
घडण्या साहित्य सेवा निरंतरी

प्रातः समयी विहंग विहार अंबरी
किलबिल किलबिल वृक्षांवरी
सुमन सुगंध पसरे वाऱ्यावरी
भ्रमर प्राशी मध फुलांतरी

उमटे दिव्य तरंग, करुंगली विणेवरी
अन तू प्रवेशिती प्रतीभारूपी अंतरी
स्वानुभवाचे बोल, परकाया प्रवेश उगम अंतरी
उचंबळे काव्य, अवतरे सत्वरी

नसो गर्व अहंता उरी
नको डावे उजवे करि
खल जळू दे कर्पूरापूरी
हीच विनवणी खरी .....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण