आज बालदिन आई लहानपणी पेरू, लहान आंबट गोड बोरं, काशी बोरं कवठ फळ , आंब्याच्या दिवसात रायवळ आंबे, भुईमूग शेंगा ऋतुनुसार अशी फळे आपणा सर्वांना खायला देत असे. ही फळे देताना विशेषतः जी फळे मर्यादित असत त्यांच्या बाबतीत वाटा करून दिला जाई आणि त्यामध्ये मग भावंडांमध्ये थोडीफार कुरबुर होत असे त्यात एक वेगळीच मजा असे. विशेषतः कवठ आणि गुळ एकत्र असा खाऊ याचा वाटा आपल्याला आहे तो खाऊन झाल्यावर भावंडांच्या वाट्यात लक्ष घालून मला थोडेसे दे अशी लाडीगोडी लावली जात असे आणि मग भाऊही थोडासा त्यातला आपल्याला देत असे. अशा या लहानपणीच्या गमती जमती काही मधुर तर काही आंबट गोड बाळ जीभ जागवणाऱ्या आणि स्मृती पटलावर उमटलेल्या. त्याची आठवण प्रकर्षाने झाली आणि मग एक काव्य उमलले ते असे. 🎶🎶 बाल दिनानिमित्त बालपणात घेऊन जाणारी आत्ताच सुचलेली कविता.. *रम्य ते बालपण* कधीच संपू नये असे.. स्मृती त्या आईने विळीवर चिरून दिलेल्या पेरूच्या, कवठ गुळाच्या, राय अवळे,गावठी आवळे, आंबट गोड बोरं, काशीबोरे , कैरी चिंच मिटक्या मारत खायच्या , चोखून खायच्या रायवळ आंब्याच्या.... पापड लाट्या गट्टम् क...