डायरी...

नववर्ष लेवुनी आले ३६५ दिवसाची पाने सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेली बांधणी माहित आहेत रंग काही धाग्यांचे काही मात्र गुलदस्त्यात ... संकल्पांचा बुकमार्क प्रौढत्वी निज शैशवास जपणे, सत्पात्री यथाशक्ती दानधर्म, काय वाचा मनोभावे सदा घडो सत्कर्म व्यायाम अन नामस्मरण यांसी ज्यादा गुणांक तेची आहे जीवनमर्म राहीन सावधान घेईन रोज आढावा झोपी जाण्याआधी मिळाले किती गुण कळण्या गुणमापनपट्टी करि उजळणी पानोपानी वर्षाअखेरीस मांडीन ताळेबंद सत्कर्माचे भांडवल देईल उत्तम परतावा राम गावा राम ध्यावा । राम जीवींचा विसावा - नंदकिशोर लेले.