पोस्ट्स

खमंग चुरमुरे चिवडा

इमेज
अन्नपूर्णा वारसा... खमंग चुरमुरे चिवडा. कृती- पावकिलो चुरमुरे, (चाळून स्वच्छ करून घेणे), तेल 3 मोठे चमचे(पाव आमटी वाटी एवढे), वाळलेली ब्याडगी  मिरच्या तीन ते चार, मोहरी, जिरे, शेंगदाणे, डाळं कढीपत्ता, मेतकूट चवीसाठी अगदी थोडी पिठी साखर . चुरमुरे खारे असतात त्यामुळे मीठ घालण्याची आवश्यकता नाही ज्यांना लागत असेल त्यांनी अगदी कमी प्रमाणात सर्वात शेवटी वापरावे.  पाटी गरम करून त्यात तेल टाकून  शेंगदाणे पाववाटी तळून घ्या,आणि बाहेर काढून ठेवा,ताजा कढीपत्ता थोडा तळून घ्यावा, बाजूस ठेवावा नंतर चवीनुसार १ ते दीड( टेबल) 🥄 पोहे खातो तो चमचा मोहरी, जिरे, आणि  अर्धा चमचा हिंग,घालून फोडणी तडतडली की गॅस बंद करून त्यामध्ये मिरच्या टाकाव्यात. मिरच्या गॅस बंद करून ठेवून फोडणीत घाला (गॅस सुरु असता  आच जास्त झाल्याने काळया होतात म्हणून )नंतर डाळं टाकावे आणि मग सर्व चुरमुरे पाटीमध्ये ओतावेत.नंतर झाऱ्याने हलवावे. चुरुमरे गरम करण्याची गरज नाही (चुरमुरे भट्टी वाल्याकडून अगर भेळ वाल्याकडून घेणे ते कुरकुरीत असतात). नंतर त्यात शेंगदाणे ,चवीनुसार मेतकूट, अगदी थोडी चवीनुसार पिठीसाखर घालून ह...

कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू ....रसग्रहण

इमेज
१९ एप्रिल १९३० श्रेष्ठ गायिका मालती पांडे यांची जयंती. मालतीताईंनी खेड्यामधले घर कौलारू, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, लपविलास तू हिरवा चाफा, त्या तिथे पलीकडे अशी एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत . कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू हे एक मातेची ममता महती सांगणार गीत आहे. घरात तान्हं बाळ झोपलेलं असलं की की आपण पाय नका वाजवू असे म्हणतो परंतु या गीतामध्ये निसर्गातील इतर घटकांनाही असे आवाहन केले आहे. गीताचे शब्द मातेच्या हृदयागत कोमल हळुवार आहेत. मालतीताईंनी ते अतिशय लडिवाळपणे गायलं आहे. अंदाजे चार एक वर्षांपूर्वी मालती पांडे यांच्या स्मृतिदिनी पुणे आकाशवाणीवर "आमच्या संग्रहातून "या सदरात त्यांची मुलाखत ऐकली आणि या गाण्याने माझ्या मनात घर केलं.आज मालती ताईंच्या जयंतीच्या निमित्ताने ते रेडिओवर पुन्हा ऐकायला मिळाले.खूप दिवसापासून या गाण्याचे रसग्रहण करण्याचे योजले होते ते आज फलद्रूप होत आहे. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू नकोस चंद्रा येऊ पुढती थांब जरासा क्षितिजावरती चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू पुष्करिणीतून गडे हळुहळु जललहरी तू नको झ...

क्षण स्वाक्षरीचा....व्यंगचित्रकार श्री मंगेश तेंडूलकर

इमेज
श्रीयुत मंगेश तेंडुलकर प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते.वैद्यकीय उपचारांसाठी तसेच रुग्णालयांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बनविणे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. ते वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या विषयावर व्यंगचित्रे सादर करीत असत. सामान्य माणसांच्या दैनंदिन अडचणींसाठी ते प्रसंगी रस्त्यावर आंदोलन करीत असत . साल २००१  सातारा येथे युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरीत असताना तेथील स्थानिक वृत्तपत्र दैनिक ऐक्य यामध्ये त्यांची व्यंगचित्रे येत असत. व्यंगचित्रे खूपच आनंद देत असत .छोटासा प्रसंग पण त्यातील विसंगती शोधून ते व्यंगचित्र काढत असत आणि छोटासा मजकूर ही लिहिलेला असे. सातारा हे महाबळेश्वर पासून जवळ असून इथे थंडी भरपूर असते. एका थंडीमध्ये सातारा पुणे या मार्गावर शिरवळ येथे लाल परी म्हणजेच सर्वसामान्यांची एसटी पहाटेच्या वेळी चहासाठी थांबली होती. दोन माणसांमधील संवाद व्यंगचित्रांमध्ये तेंडुलकरांनी लिहिला होता आणि यथायोग्य चित्र काढले होते.... एक प्रवासी दुसऱ्या प्रवासास विचारत आहे, शिरवळ थांबा आला आहे तर उतरा चहा पिऊया.... तर त्याचा मित्र त्याला म्हणतोय 'आरं ....एवढी थंडी हाय निसतं नाव काढलं तरी घाम फुटतिय...

चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें -रसग्रहण

इमेज
  श्री सरस्वती देवी प्रसन्न चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें  तुझे नाम गोड किती घेऊं आम्ही वाचे     अम्हां काय त्याचें चंद्र-सूर्य प्रकाशतां  होई काया शुद्ध-स्वच्छ तुझे नाम घेतां     कटेवरी घेऊनी कर उभा तोची राहे  दास ह्मणे जातां शरण हरि वाट पाहे   गीतरचना- विश्वनाथ जोगळेकर संगीत- अनिल मोहिले गायक - शरद जांभेकर भक्ती संगीत यातून परमेश्वराला एक प्रकारची आळवणी असते; परमेश्वराचे गुणगान असते. आपण करतो ती श्रवण भक्ती असते. गाण्याचे अथवा कवितेचे रचनाकार कवी गीतकार आणि संगीतकार यांची ती किर्तन भक्ती असते. पहाटेच्या वेळेला सारे वातावरण शांत असतं. माणसाला झोप झाल्याने तनमनात उत्साह असतो.मन प्रसन्न असतं; अशा वेळेला भक्ती संगीत आपल्याला ईश्वर शक्तीशी जोडलं जाण्याची संधी देत असते. महाराष्ट्राला संतांची तसेच थोर कवी आणि गीतकार यांची परंपरा आहे. 'श्रवणं किर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।' हा भागवतातील श्लोक उद्‌धृत करून, समर्थांनी नवविधा भक्तीचे विवेचन केले आहे. सगुणातूनच निर्गुणाकडे जायचे...

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

इमेज
  श्री सरस्वती देवी प्रसन्न पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरि हरि हरि रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली फुलारली झाडे -वेली जाग वारियासी आली वेळ शीतळ साजिरी पक्षी गाती नाना परी गेला दिस नाही येत काही करावे संचित साधा आपुलाले हित नाम वाचे उच्चारित नाम घेता घरी दारी उभा विठ्ठल कैवारी सरे अंधाराचा पाश झरे मोकळा प्रकाश मुखे करा नामघोष जाती जळूनिया दोष तुका म्हणे जन्मा वरी ठेवा तुळस- मंजिरी गीत- ग दि माडगूळकर संगीत आणि स्वर- स्नेहल भाटकर चित्रपट तुका झालासे कळस राग भूप आणि नट महाराष्ट्रामध्ये उज्वल आणि महान संत परंपरा आहे - संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत एकनाथ समर्थ रामदास संत नामदेव बहिणाबाई आदि अनेक संत होऊन गेले. या संतांनी नरदेह दुर्मिळ असून या जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर ऐहिकात जगताना पारलौकिक कल्याण साधणे ही महत्त्वाचे आहे असे अभंग ओवी वांग्मय यातून नाना प्रकारे सांगितले आहे. प्रपंच जगत असतानाच परमार्थ करावयाचा आहे. कलियुगात संत सज्जन संगती, आणि नामस्मरण याचे अनन्य महत्व त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे. कोणतेही उपास तपास, कठीण योगसाधना यापेक्षाही कोणतेह...

क्षण स्वाक्षरीचा -पंडित प्रभाकर कारेकर

इमेज
  क्षण स्वाक्षरीचा - गोवेकरी गानवैभव पंडित प्रभाकर कारेकर पंडित प्रभाकर कारेकर देवाघरी गेल्याची बातमी कळली आणि मन विषण्ण झालं . त्यांच्या सातारा येथील गायनाच्या मैफलीची आणि नवी मुंबई मध्ये  नोकरीस असताना झालेली प्रत्यक्ष भेट, मैफिल या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या.  त्यांच्या गायकीचा अनुभव सातारा येथे समर्थ सदनामध्ये अनेक वेळा अनुभवता आला. श्रीयुत अरुण गोडबोले हे बहु आयामी व्यक्तिमत्व त्यांना हक्काने पाचारण करत असे आणि सातारा भूषण या पुरस्कार निमित्ताने अथवा काही अन्य निमित्ताने समर्थ सदनात त्यांच्या मैफली होत असत. तसेच यासह अनेक  उत्तम कार्यक्रम वक्ता दशसहस्रेषु  शिवाजीराव भोसले , राम शेवाळकर यांची भाषणे ही समर्थ सदनात ऐकता आली हे आम्हांस लाभलेले थोर भाग्यच होय. गोव्याच्या मातीमध्ये अलौकिक सुगंध आहे. अनेक उत्तम साहित्यिक, संगीत नाट्य कलाकार मंडळी या भूमीमध्ये जन्मली आणि त्यांनी  मराठी जना मनात साहित्य आणि गाण्याचे संस्कार रुजवले,मनाचे समृद्ध उन्नयन केले. प्रभाकर कारेकर हे याच सधन, सजल, सकस पावन भूमीचे गानरत्न.मलमली झब्बा आणि पायजमा, मागे घेतलेले क...

नामस्मरण महती

इमेज
  श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज जयंती निमित्ताने ही काव्यांजली...   🌹नामस्मरण महती 🌹 सांगती वर्णिती सारे संत ग्रंथ नवविधा भक्ती महान थोरी,  रूचे, झेपे ते मुमुक्षू  नाम उच्चार करी. वारकरी जपे  राम कृष्ण हरि पांडुरग हरि,  रामभक्त जपे   श्रीराम जय राम जय जय राम  मंत्र त्रयोदशाक्षरी . नरदेह दुर्लभ परी त्रिविध ताप बद्ध  मुमुक्षु साधक सिद्ध प्रवास कठीण तारण्या कलियुगी नामस्मरण हाच सोपान  सांगती सारे महानुभाव संत सज्जन  नको देऊ परपीडा,  नको करू भेदभाव   आहे प्राणिमात्रा सर्व जीव समान  करिता नामजप जागृत होतो सदभाव  षड्रिपूवरी येते हळू हळू नियंत्रण होई  मन  चित्त  शुध्द पावन  लाभे  सुख शांती समाधान  कालचक्र गती अगम्य  करू आनंदे विहित कर्म  अखंड  घडो नामसाधना पार  करण्या एक एक पायरी  परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी  उमलले  काव्य सुमन  🌹दैनंदिन प्रवचन वाचनातून      अर्पितो  श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरणी...