नामस्मरण महती
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज जयंती निमित्ताने ही काव्यांजली...
🌹नामस्मरण महती 🌹
सांगती वर्णिती सारे संत ग्रंथ
नवविधा भक्ती महान थोरी,
रूचे, झेपे ते मुमुक्षू
नाम उच्चार करी.
वारकरी जपे
राम कृष्ण हरि पांडुरग हरि,
रामभक्त जपे
श्रीराम जय राम जय जय राम
मंत्र त्रयोदशाक्षरी .
नरदेह दुर्लभ परी त्रिविध ताप
बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध प्रवास कठीण
तारण्या कलियुगी नामस्मरण हाच सोपान
सांगती सारे महानुभाव संत सज्जन
नको देऊ परपीडा,
नको करू भेदभाव
आहे प्राणिमात्रा सर्व जीव समान
करिता नामजप जागृत होतो सदभाव
षड्रिपूवरी येते हळू हळू नियंत्रण
होई मन चित्त शुध्द पावन
लाभे सुख शांती समाधान
कालचक्र गती अगम्य
करू आनंदे विहित कर्म
अखंड घडो नामसाधना
पार करण्या एक एक पायरी
परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी
उमलले काव्य सुमन 🌹दैनंदिन प्रवचन वाचनातून
अर्पितो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरणी 🌹 आज जयंती म्हणून.
श्रीराम जय राम जय जय राम!
🙏🚩 नंदकिशोर लेले.
टिप्पण्या
श्रीमहाराजांचे प्रत्ययाचे बोल आपण कवितेत मांडले आहेत.छान.हे बोल आपल्या प्रत्ययाचे लवकर
होवोत ही श्रींना प्रार्थना
श्रीराम