दृष्टी






००९ ते  २०१३ या काळात  मुंबई  इथे   नोकरीस जाताना कधी ताडदेव तर  कधी पेडर रोड मार्गे कफ परेडला  बसने जात असे . हाजीअली चा स्टॉप गेल्यावर पेडर रोडवर  लता मंगेशकर यांचे घर दिसे. पुढे मुकेश अंबानी यांनी बांधलेली टोलेजंग इमारत पाहायला मिळे.  परुंतु   ताडदेव मार्गे जाताना  जुन्या काळातील  एक देखणी इमारत  तिच्या स्वागत दारी उभी एक मनोहारी गुलाबी बोगनवेल  सकाळच्या  वेळेस डोळयास सुखावून जाई- जणू सोने पे सुहागाच असेच सारे दृष्य .   सदर  इमारत व्हिक्टोरिया  मेमोरियल अंध शाळेची  आहे. ही इमारत बघून मन हरखून जात असे  पण एवढी सुंदर इमारत ती सुंदर बोगनवेल  त्या शाळेतील  मुलांना ती अंध असल्यानं  पाहता येत नाही याची मनाला खंत वाटत असे . त्या विचारातूनच एक काव्य सुचले होते ते असं आहे 

दृष्टी

अंध शाळेची इमारत सुंदर
स्वागत दारी बोगन वेलीची कमान

सुखवी नयन आणि हरखून टाकी मन



बघण्याची आहे साऱ्यांना मुभा

(बघण्याची आहे खरंच का
साऱ्यांना मुभा?)

दातृत्वाची साक्ष देण्या महाल आहे उभा !


टिप्पण्या

Shrikant Lele म्हणाले…
अतिशय संवेदनशील काव्य !
जयंत कुलकर्णी म्हणाले…
अत्यंत संवेदनशील समयोचीत सुंदर काव्य रचना
Satish Degaonkar म्हणाले…
वा...वा... खरोखरीच संवेदनशील.... उत्तम!
अशोक आफळेO म्हणाले…
लेले साहेब, या कवितेला कारुण्याची
किनार आहे.ती तुम्ही छान अधोरेखित
केली आहे.
अशोक आफळे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण