हिंदोळा......
श्रावण सरी आणि साहित्यरूप सरी या दोन्ही या आनंददायी असतात ... श्रावण झड लागलेली असताना .... मला सुचलेलं काव्य
हिंदोळा......
कवितेच्या हिंदोळ्यावर...
दिवस माझा चांगला जातो....
श्रावण माझ्या मनांत.....
नित्यच बरसत राहतो
शब्द नाद ... जणू सतारीचा झंकार
शब्द सुमन सुगंधी , जणू जाई...जुईचा वेल
शब्द उल्हासी आनंदी,सुर्याप्रकाशासम
शब्द हळवे, कोमल , कोवळे जणू वाऱ्याची झुळूक..
शब्द लडिवाळ, तान्ह्या बाळासम
शब्द प्रेमळ ,शामच्या आईसम
शब्द मंजूळ, कृष्ण बासरीसम
शब्द राष्ट्रप्रेमी , जयोस्तुतेसम
शब्द मोहवी, इंद्र धनुष्यासम
शब्द क्षणभंगूर , फुलपाखरासम
शब्द भुलवी, ऋणझुण साद घालती मज भ्रमरासम.....
शब्द शांत, देवघरातील समईसम
शब्द प्रासादिक, ज्ञानेश्वरीसम
क्षणार्धी विसरी शीण, विरून जाती त्राण,
काय वाचा मन हरीचरणी समर्पण.......
नंदकिशोर लेले
nandkishorslele.blogspot.com
टिप्पण्या
लेलेसाहेब तुमची कविता छान जमली आहे शब्दांना तुम्ही अनेक दालनात सहजपणे फिर वून आणले आहे.पण ही सफर गे य आहे .रचना करताना त्यात कुठेही रुक्षता आली नाही
एकूण काय तर तुमची प्रतिभा
ब ह र ते आहे
कालच कोमर पंत सरांचा फोन झाला नेहमीप्रमाणे चर्चा रंगली