लेखणीचा प्रवास...

लेखणीचा प्रवास...
बालपणी सलगी पाटी वरील- पांढऱ्या ठिसूळ पेन्सिलशी
क्षणात विसरी काही, क्षणात नवीन हवे काही, निरागसच सर्व काही
षड्रिपूशी सलगी नाही...
आणि जाता वरच्या यत्तेत हाती षटकोनी पेन्सिल आणि वही
टोक मुंड होता खूर (Sharpner) येई कामी, सोलता वर्तुळाकार टरफले वाटे मजा भारी
खोडण्या काही चूक आता हाती सुगंधी खोडरबर
पण चढत जाता वरची इयत्ता येई हाती शाईपेन
सांडता शाई मदत करी टीपकागद पण चूक होता पुसून टाकणे पडे भारी ,
खूण चूकीची राही पानी
भाग्य सारं बदलत जाई
हाती पडी बॉल पेन आता
चूक पुसणे होई महाकठीण
साठी वय होता कळे,उमगे अरे
काया वाचा मन हीच तर पेनं होती सारी
हा तर प्रवास झाला होऊन सलगी षड्रिपूशी
मीच लिहून ठेवी पुनर्जन्माची ललाट रेषा ही तर मानव जन्मा तुझी कहाणी
म्हणून आता आठवी तुक्याचा अभंग लहाणपण देगा देवा,मुंगी साखर रवा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण