बीजगीत

//सरस्वती देवी प्रसन्न //

बीजगीत 

आपण  दैनंदिन जीवनात  सर्वसाधारणपणे असं बघतो की एकीकडे अमाप मुबलकता आहे   मग ती साधन संपत्तीची  (उदा -जमीन,घराची जागा ,पाणी ,वाहन )  अथवा रिकामा  वेळ  आणि यातून  चैन ,सुखलोलुपता  आणि  अंतिमतः उन्मादाकडे वाटचाल सुरु आहे.  तर  एकीकडे यापासून वंचित असा समाज आहे .  

विसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीस अनेक सुख सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विसंगतीतील संगती अशी की साऱ्या  नव्या पिढीस  आपल्या घरची आर्थिक स्थिती  काहीही असो सर्व प्रकारची आधुनिक  वाहनं  व Gadgets वापरण्यास हवी असतात. बदलती कुटुंब व्यवस्था  Nuclear Family  आणि  परिणाम म्हणून मिळालेलं अनिर्बंध स्वातंत्र्य यातून नवीन पिढीस लहान मुलांना सहजचं हाती सर्व काही फारसं काही  शारीरीक वा मानसिक  न कष्ट पडता  मिळू लागलं आहे .  आधुनिक Gadgets चा वापर कसा करावयाचा याचं भान  हे  सारेच जण श्रीमंत कुटूंबातील असो वा  मध्यम /गरीब कुटूंबातील असो विसरून गेले आहेत .   दुचाकी  वाहन  ,मोबाइल न  मिळणं व तो योग्य प्रकारे    न  वापरणं यातुन अनेक दुर्घटना घडत  आहेत. मुलांच्या  आई बाबांना त्यांच्या नोकरी वा व्यवसायानिमीत्त अधिक काम व लांबचा प्रवास यातून  मुलांच संगोपन करण्यास वेळ नाही . तर   घरात  पूर्वी  पहायला मिळणारे आजी आजोबा आता  कधी परवडतं म्हणून तर कधी पटतं नसल्यानं दुसऱ्या ठिकाणी राहत आहेत. या सर्वांतून या  मुलांची एककल्ली वृत्ती वाढीला लागली आहे .  मुलानं संगत बरोबर आहे की नाही  याकडे  बघायला  आई वडिलांना  वेळ नाही. जीवन मूल्य नकळत  माहित  होणं आणि रूजण हे  आता सहज शक्य  नाही. नक्कीच  कुठंतरी बीज संस्कार होणं दुरापास्त होत चाललं आहे.  शाळा व कॉलेज  ही दुकानें  झाली आहेत. शिक्षण हे पूर्णपणे बाजारु झालं  आहे.   अगदी सर्वचकडे अशी परिस्थिती नाही .  समाजातील   अपवाद म्ह्णून  काही श्रीमंत, उच्च मध्यम  /मध्यम वर्गातीळ मुलं तसेच  लहान घरातून व झोपडीत  राहणारी  काही कष्टकरी माणसं  आणि मोजक्या संस्था  ही  अजूनही मुलांवर संस्कार मूल्य बिंबवत आहेत . दहावी  बारावीच्या   परीक्षा  निकालानंतर  हे  बातम्यांमधून दिसतंच . 

शेतकरी वर्गातील असंतोष आता ठळक पणे दिसतो आहे . यातील राजकारण कितीही असली तरी   पाऊस  आणि पाणी या भवती सारं जीवनचक्र गुंतलेल्या समाजा विषयी  आणि शेतात राबण्याऱ्या हातांविषयी संवेदना बातमी वाचून सोडून देणे एवढीच शहरी जनतेची   आहे . अतिवृष्टी  आणि अवकाळी पाऊस,गारपीट , या आपत्ती तर हाता तोंडाशी आलेली पीक ,फळबागा यांचं    अतोनात नुकसान करून  हाहाकार माजवत आहेत   आणि फणी सारखी  वादळं  मनुष्य  व वित्तहानी करत आहेत.   'जल  है  तो कल  है ! '     हे विदारक सत्य अंमलात  आणण्यास   फार  लोक  तयार नाहीत .   सर्वच  वर्गात संवेदना   बोथटलेल्या  समाजाला   नैसर्गिक आपत्ती  अथवा अतिरेकी  हल्ला झाल्याशिवाय काही उमगत नाही .  

या सर्व पार्श्वभूमीवर सुचलेलं  हे काव्य आहे. 


धरतीतून  प्रगटण्या उगवलं पाहिजें 

उगवण्या धरतीतून  आधी रुजलं पाहिजें  

रूजण्या  धरतीत  आधी भिजलं पाहिजें

भिजण्या  धरतीत  आधी वाळलं  पाहिजें   

पिकलंच नाही तर खाणार काय हे कळलं पाहिजें

निसर्ग चक्र, बळीराजाचं जीवन जाणलं पाहिजें 

बीजगीत गाण्या  मन हिरवं( संवेदेनशील) पाहिजें !

nandkishorslele@gmail.com

nandkishorslele.blogspot.com



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी