आठवणीं...



आठवणीं...

ढग दाटून येतात
तशाच आठवणीही....
ढग दाटले की बरसतो पाऊस ..
आठवणी दाटल्या की बरसतात अश्रू..
कधी घेऊन येतात त्या बासरीचा मंजुळ स्वर
तर
कधी व्हायोलिनचे आर्त सूर..
अन करतात अंतर्मुख...
आठवणींचे पक्षी हलकेच येऊन बसतात खांद्यावर आणि
होऊन जातो आपण आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार...
मोकळं मोकळं वाटतं झाल्यावर पायउतार
जसा पाऊस पडून गेल्यावर लख्ख होतं आभाळ
मोहरतो क्षण अन देऊन जातो दिवसभराची संजीवनी
आठवणी असतात आई-वडिलांच्या ,कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या
आठवणी असतात बालपणीच्या ,तारुण्याच्या , प्रौढपणाच्या आणि पिकल्या पानाच्या
आठवणी असतात शाळा-कॉलेजातील शिक्षकांच्या, जिवलग मित्रांच्या,
नोकरी व्यवसायातील जिवलग सहकाऱ्यांच्या
आठवणी असतात गावाकडील वास्तूच्या, आवडलेल्या पुस्तकांच्या ,ऐकलेल्या विद्वत्तापूर्ण व्याख्यानाच्या गाण्यांच्या मैफिलीच्या ,पाहिलेल्या अजरामर सिनेमा नाटकांच्या ...
कधी बंदिस्त करतो कॅमेरा क्षण आठवणींचे
तर
काही क्षण होतातच हृदयस्थ ...
जशी प्रतिभावंतांची भेट
सत्पुरुषांचे दर्शन
निसर्गानुभूती आणि
आडवळणावर भेटलेली माणुसकी ....
आठवणी म्हणजे जीवन नौकेने काठावर येणं,विसावणं...
पुन्हा मार्गस्थ होण्यासाठी
लेवून हाती सुखदुःखाची वल्हे !
नंदकिशोर लेले
nandkishorslele.blogspot.com

टिप्पण्या

मुकुंद इंगळे म्हणाले…
आठवणींचा पाऊस आणि पावसाची आठवण ...दोन्हीच्या वर्षावात तुम्ही भिजवले आहे.सुंदर लेखन आणि नकळत पणे वाचकाला आपापल्या मनात ल्या आठवणीत मुशाफिरी करायला भाग पाडणारे लेखन आहे हे,.
अनामित म्हणाले…
लेले साहेब नाद मधूर आणि आशयघन रचना.आठवण हा विषय
नजरेसमोर ठेऊन आपला कल्पना विलास छान जमलाय.आठवणी हे सुखान जगण्याचं संचित आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण