पु ल- एक जिवंत अनुभव

 


आज पु लंची जयंती ,विनम्र अभिवादन.

पु ल- एक जिवंत अनुभव

पु ल नेहमी सांगत असत सर्व प्राण्यांमध्ये माणसाला तेवढा हसता येतं आणि म्हणून प्रत्येक माणूस , त्याचा स्वभाव त्याच्या लकबी व लोकजीवन याविषयी त्यांना विलक्षण उत्सुकता असे. साहित्यातली अन संगीतातली 'अपूर्वाई 'काय असते हे त्यांनी मराठी माणसाला अतिशय सहजपणे सांगितलं.

पु ल गेल्यानंतर त्यावेळी श्रद्धांजलीपर एक छोटसं काव्य सुचलं होतं ते आता जरा मुलामा देऊन (पुलंच्या भाषेत सांगायचं झालं तर थोडा नट्टापट्टा करून किंवा दिवाळी सीझन सुरू असल्याने फडताळातल्या मोठ्या पितळी भांड्यांना कलहई करून ) सादर करीत आहे.

पु. ल गेले......

सारा आसमंत सुनासुना झाला

अवघ मराठी मन हळहळलं...

हृदयी पीळ पडला ... एक बहुरुपी गेला

पुलंनी आम्हाला काय नाही दिलं..

श्वास मोकळा केला

हसू फुटले ,

घाम टिपला

जीव गहिवरला

अश्रू तरळले

आजार पळाला

नैराश्य संपलं

आशा पालवली

माणसामाणसातील अंतर कमी केलं

दातृत्वाला दिशा दिली...


टिप्पण्या

Subodh Pathak म्हणाले…
सुरेख लिहिले आहे👌👌

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण