ध्यासपंथी गोखले काकू




ध्यासपंथी गोखले काकू 


माधवी नाम लेवून, 

सदा हसतमुख राहून

सहज मधूर लाघव  संवाद 

 साधीला आपण ...

बहुधा बोल तर कधी अबोल राहून पाठीवरी आश्वासक थाप दिली आपण ...

आम्हा सर्वां चिरंतन मधूकोशी धाग्यात गुंफले आपण...  

अक्षर योगी आपण , साहित्य प्रेमी आपण,  शब्दमोल जाणून स्पष्ट शब्दोच्चार करीत केले विविध अभिवाचन आपण ...

साक्षेप समर्थांचा" हे अभिवाचन अधिक ठसले ,बिंबले आमच्या मनी हृदयी 

अबालवृद्ध यावरी अपार संस्कार केले आपण...

२६ जानेवारी १५ ऑगस्ट असता उत्साह ओसंडित प्रोत्साहित केले आपण...

अहो वर्तनातून देव देश धर्म याचे मर्म सांगीतले आपण....

गीताप्रेमी कर्मयोगी आपण... संस्कृत पठण विविध श्लोक सुभाषिते शिकवत शहाणे केलें आम्हा आपण ...

 देहभोग सोशिले परि उच्चार त्यांचा न केला आपण...

रसरशीत जीवन जगला आपण...

कार्यसुगंध दरवळे म्हणूनी 

काव्य रचण्या शब्द सारे आले धावून ...

समर्थ रामदास रचित पावन भिक्षा श्लोक (कोमल वाचा दे रे राम....१२ श्लोक ) सारे गुण 

अंगीकारले आपण अन् इंदिरा एकादशीचा योग साधून आम्हा अंतर्मुख करित पारखे केले आपण.. 

 अतीव दाटून येती लोचन   करितो  काव्यसुमनें ही अर्पण  बहुतआदरे,सदभावे आम्ही मधुकोशी सर्वजण 

देत अभिवचन उज्ज्वल, उन्नत करू मार्ग जो दाविला आपण.



.


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
नंदूजी आपण गोखले काकुंविषयी फार सुंदर रचना केली आहे. अगदी त्यांची छबी डोळ्यांसमोर उभी राहावी इतके. मधुकोष वासी कधीही त्यांना विसरू शकणार नाहीत.
अनामित म्हणाले…
Khup Chan lihila ahe kaka! Kharach kaku ashya hotya!
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण वाचून कळवले आनंद वाटला. काकू यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य खूप मोठे आहे. आपले नाव कृपया सांगावे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
धन्यवाद. आपले नाव कृपया सांगावे.
Shrikant Lele म्हणाले…
अतिशय सुंदर शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
जयंत कुलकर्णी म्हणाले…
हा अभिप्राय मी आपला शेजारी जयंत कुलकर्णी यांनी दिला आहे.


अनामित म्हणाले…
नंदकिशोर जीं लेले आपण अतिशय उत्कट भावपुर्ण भाषेत गोखले काकू यांच्या सर्व आठवणी त्यांचे व्यक्तिमत्व याबद्दल हा ब्लॉग लिहून त्यांना समर्पित श्रद्धांजली अर्पण केली आहे. अतिशय सार्थक जीवन त्या जगल्या. मधुकोष परिसरात कुठे ही नियमित होणारी त्यांची भेट आता नाही. त्यांचे सुविचार, विविध माहितीपूर्ण असे छोटे लेख यामुळे रोज उत्सुकता असायची गेट जवळील बोर्ड वर आज काय लिहिले आहे.
भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण काव्य वाचून अभिप्राय दिला खूप बरे वाटले. अशी माणसेही आदर्श असतात आपल्या अंगात त्यातील काही गुण आले तरी आपले जीवन थोडेफार सार्थकी लागेल. कृपया आपले नाव कळवावे ही विनंती
Nikhil म्हणाले…
आम्हा सर्वां चिरंतन मधूकोशी धाग्यात गुंफले आपण..
Atishay sundar rachna..
Satish Nerkar म्हणाले…
नंदू, समर्पक शब्दांनी व्यक्तिमत्व छान साकारलं आहे.... मीही तो बोर्ड अनेकदा थांबून वाचला आहे.....
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
निखिल तू लगेच वाचून अंत:करणापासून
अभिप्राय दिलास खूप बरे वाटले.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तू अगदी लगेच वाचून आपुलकीचा अभिप्राय दिलास खूप खूप बरं वाटलं रे... बाळासाहेब निमंत्र्यांनी तू माझी आठवण काढत आहेस असं सांगितले होते म्हणून मुद्दाम तुला कविता पाठवली.
अशोक आफळेO म्हणाले…
लेले साहेब, लेख उत्तम जमला आहे.शैली लघुनिबंध कारासारखी आहे.गोखले काकूंची उपक्रमशीलता
खरोखरच भरभरून दाद द्यावी असेच आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण