ऋतसंहार
वरील काव्य श्री देशमाने काका यांचे मित्र प्रसिद्ध कवी श्रीयुत सदानंद डबीर यांनी रचलं आहे.. काव्य उत्तमच आहे . हे काव्य वाचून आणि चित्र बघून मला काव्य सुचले....
ऋतसंहार ११ .१०.२०२३.
तुझं नयन दल,
गालावरील खळी,
शुभ्र दंतपंक्ती,
चाफेकळी नाक
लाल ओष्टकमल
आणि
मोहक केशसंभार
हाच सारा ऋतुसंहार
जेंव्हा असतीस तु जवळपास
पाहून तुझी रम्य अदा
ऋतू बहरतात सत्वर सदा खास
कवित्व ऋतूसाठी नच अडे
नसे आमुचें प्रेम नुसते बोलघेवडे
https://www.mahamtb.com/Encyc/2024/7/6/mahakavi-kalidas.html या लेखातून उधृत....
‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्यही कालिदासाची प्रथम रचना. ‘संहार’ या शब्दाचा अर्थ येथे विध्वंस करणे किंवा नाश करणे, असा नसून संचय करणे, एकत्रित करणे असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. कालिदासाने लिहिलेले ‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्य म्हणजे सहा ऋतूंचे सहा सोहळे सांगणार्या ऋतुवर्णनाचा संग्रह होय. या काव्यात सहा सर्ग आहेत. त्यात एकूण १४४ श्लोक आहेत. प्रत्येक सर्गात १६ ते २८ श्लोक असे त्याचे सुयोग्य विभाजन. संपूर्ण काव्य हे प्रियकराने प्रेयसीला उद्देशून म्हटलेले. असे असूनही त्यात प्रेयसीचा उल्लेख नाही आणि प्रियकर, अर्थात काव्याचा नायक हा कोणीही मनुष्य नसून स्वतः निसर्ग असल्याचेच स्पष्ट होते.
कालिदासाच्या काव्याचा आरंभ होतो तो ग्रीष्म ऋतूच्या बहारदार वर्णनाने. त्यानंतर क्रमाने वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत ऋतूंमधील निसर्गचित्रण कालिदासाने चितारले आहे. यातील प्रत्येक ऋतूनुरुप व ऋतुबदलानुसार वातावरणातील झाडे, वेली, पशू, पक्षी इत्यादी पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये होणार्या सूक्ष्म बदलांचे प्रत्ययकारी वर्णन या काव्यात आढळते. त्याचबरोबर, या ऋतूकाळातील मानवी भावभावनांचे कालिदासाने केलेले हृद्य रेखाटनही मनाला स्प स्पर्शून जाते.
कालिदासाची आनंदी व खेळकर लेखनशैलीही अतिशय प्रभावी. तसेच, निसर्गातील प्रत्येक सूक्ष्म घटकाचे कालिदासाने शब्दबद्ध केलेले मार्मिक वर्णन विशेष प्रशंसनीय. कालिदासाने या खंडकाव्यात ‘वसंततिलका’, ‘मालिनी’, ‘उपजाती’ इत्यादी अलंकारांचा अगदी चपखल वापर केला आहे.
https://www.mahamtb.com/Encyc/2024/7/6/mahakavi-kalidas.html
टिप्पण्या