जीवनरंग...
✍️
त्याने निसर्ग कविता हिरव्या
रंगानं लिहिल्या ..
प्रेम कविता गुलाबी ..
दुःखद अनुभव काव्य लाल, करड्या अन् सरड्या रंगानं
आता मात्र तो साऱ्या कविता फक्त निळ्या रंगानं लिहितो ....
कारण
नदी खाली असते सागरास मिळते ....
आकाश वर असते सर्वांना सामावून घेते ...
ते निळा रंग धारण करतात.
प्रवाही राहणं हेच जीवन हे आता त्याला उमजलंय.
टिप्पण्या