चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें -रसग्रहण

श्री सरस्वती देवी प्रसन्न चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें तुझे नाम गोड किती घेऊं आम्ही वाचे अम्हां काय त्याचें चंद्र-सूर्य प्रकाशतां होई काया शुद्ध-स्वच्छ तुझे नाम घेतां कटेवरी घेऊनी कर उभा तोची राहे दास ह्मणे जातां शरण हरि वाट पाहे गीतरचना- विश्वनाथ जोगळेकर संगीत- अनिल मोहिले गायक - शरद जांभेकर भक्ती संगीत यातून परमेश्वराला एक प्रकारची आळवणी असते; परमेश्वराचे गुणगान असते. आपण करतो ती श्रवण भक्ती असते. गाण्याचे अथवा कवितेचे रचनाकार कवी गीतकार आणि संगीतकार यांची ती किर्तन भक्ती असते. पहाटेच्या वेळेला सारे वातावरण शांत असतं. माणसाला झोप झाल्याने तनमनात उत्साह असतो.मन प्रसन्न असतं; अशा वेळेला भक्ती संगीत आपल्याला ईश्वर शक्तीशी जोडलं जाण्याची संधी देत असते. महाराष्ट्राला संतांची तसेच थोर कवी आणि गीतकार यांची परंपरा आहे. 'श्रवणं किर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।' हा भागवतातील श्लोक उद्धृत करून, समर्थांनी नवविधा भक्तीचे विवेचन केले आहे. सगुणातूनच निर्गुणाकडे जायचे...