खमंग चुरमुरे चिवडा
अन्नपूर्णा वारसा... खमंग चुरमुरे चिवडा.
कृती- पावकिलो चुरमुरे, (चाळून स्वच्छ करून घेणे), तेल 3 मोठे चमचे(पाव आमटी वाटी एवढे), वाळलेली ब्याडगी मिरच्या तीन ते चार, मोहरी, जिरे, शेंगदाणे, डाळं कढीपत्ता, मेतकूट चवीसाठी अगदी थोडी पिठी साखर .
चुरमुरे खारे असतात त्यामुळे मीठ घालण्याची आवश्यकता नाही ज्यांना लागत असेल त्यांनी अगदी कमी प्रमाणात सर्वात शेवटी वापरावे.
पाटी गरम करून त्यात तेल टाकून शेंगदाणे पाववाटी तळून घ्या,आणि बाहेर काढून ठेवा,ताजा कढीपत्ता थोडा तळून घ्यावा, बाजूस ठेवावा नंतर चवीनुसार १ ते दीड( टेबल) 🥄 पोहे खातो तो चमचा मोहरी, जिरे, आणि अर्धा चमचा हिंग,घालून फोडणी तडतडली की गॅस बंद करून त्यामध्ये मिरच्या टाकाव्यात. मिरच्या गॅस बंद करून ठेवून फोडणीत घाला (गॅस सुरु असता आच जास्त झाल्याने काळया होतात म्हणून )नंतर डाळं टाकावे आणि मग सर्व चुरमुरे पाटीमध्ये ओतावेत.नंतर झाऱ्याने हलवावे. चुरुमरे गरम करण्याची गरज नाही (चुरमुरे भट्टी वाल्याकडून अगर भेळ वाल्याकडून घेणे ते कुरकुरीत असतात). नंतर त्यात शेंगदाणे ,चवीनुसार मेतकूट, अगदी थोडी चवीनुसार पिठीसाखर घालून हलवावे . शेंगदाणे भाजलेले सोलून घातले तर अधिक उत्तम म्हणजे तेल कमी लागते.
चुरमुरे चिवडा नंतर थोडा गार झाला की पर्ल पेटच्या बरणीत,अगर स्टील डब्यात काढून ठेवावा.
डॉक्टर हल्ली फरसाण खाऊ नका असा सल्ला देतात. असे चुरमुरे हे दुपारी चहाच्या वेळी अगर संध्याकाळी खाता येतात.त्यात चिंच पाणी, कांदा कोथिंबीर घालून उन्हाळ्यात कैरीचा तक्कू घरगुती उत्तम भेळ तयार होते.
घरचे खाल्ले की अपाय नाहीत...(..हात पाय हलल्यावर तोंड हलवावे )श्रम करून खा. ..जास्त आनंद मिळतो.
*अनुभवाचे बोल:*
घरात खूप वयस्कर माणसे असतील तर चिवड्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे वरून घालण्या अगोदर चिवडा त्यांच्याकरता काढून ठेवावा. कारण त्यांना ते खाताना त्रास होतो,अगर ते काढून द्यावे लागतात.
घरचं खा ... स्वस्थ रहा... पुन्हा भेटू .... एका नव्या पदार्थाची चव चाखण्यासाठी तोपर्यंत बाय बाय...🖐️✋😀
टिप्पण्या
I am reducing eating outside food and cooking at home. Your article makes it easy and very tasty!
Thank you!
एकीकडे राखून आईचा आदर
नंदकुमारजी करिती पदार्थ सादर |
आजचा पदार्थ चुरमुरे चिवडा खमंग
खायच्या कल्पनेनेच वाढविली उमंग!⚘️