पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अक्षर प्रवास..हस्ताक्षर दिनानिमित्ताने ✍️

इमेज
  अक्षर प्रवास.... हस्ताक्षर दिनानिमित्ताने ✍️ जन्मल्यावरी उमटतो प्रथम हुंकार ,  हुंकार नव्हे तो आदिबीज ओंकार बाळ बोले डोळ्यातूनी सुरू होई मातृ नवजात तान्हा संवाद  बोबडे बोबडे ते कान्हा बोल   कळे आकळे मातृहृदयास  मग काऊ चिऊ वनराजी ओळख  अशी ही  नवबोली  आई दावी क्रमाक्रमाने  अक्षर खोली......   श्री  लिहून दावी आई    हातात पाटी पेन्सिल देई        गिरवाया अक्षर आरंभ    मग उमटते गमभन  गणेश शारदा ज्ञान शक्ती रूपे  देती नकळत आत्मभान  होतो यशस्वी शिक्षणक्रम पूर्ण करू मातृ पितृ शिक्षका वंदन ऋण  त्यांचे महान असे असावे हस्ताक्षर की  ठरावी ती आपली  अक्षर ओळख  लिहावे नित्य संत साहित्य  रामनाम अन् सुविचार  चिरंतन असे काही जे आहे  नित्यसत्य  अनुसरून ते राही विवेक जागृत लिहिता मिळतो मानसी आराम,आत्मिक समाधान  हात लिहिता ठेवता,  होते मनाची मशागत  मोहक हस्ताक्षर पाहता वाटे ही जणू मोत्यांची माळ  आनंद देई आपणांस  आणि पाहून वाचून द...

आठवणीतले आपटे काका

इमेज
  आठवणीतले आपटे काका सूर आणि शब्द संगीत आणि साहित्य याचा सुयोग्य मेळ साधणारे ,भूगोलाचे प्राध्यापक असलेले ,योग अभ्यासी आणि साऱ्या मधुकोशी मंडळींना त्यांच्या कलाकृती लेखन नाट्य अभिनय कलाविष्कार विविध माध्यमातून सादरीकरण यांना दिलखुलास दाद देणारे सदा प्रफुल्लित ,उत्साहीत असणारे आणि ठेवणारे काका देवाघरी गेली ही बातमी कानावर पडताच  चर्र झाले. काका हे अष्टावधानी होते.काका अधून मधून त्यांच्या गॅलरीतून चंद्र आणि सूर्य उदय अस्त, पावसाळ्यातील निसर्ग विभ्रम टिपत असत. पाठीमागच्या देशमुख यांच्या शेतातील चाललेल्या हालचाली ही ते टिपत असत. असे अतिशय प्रसन्न मनाचे आणि जीवन रसरसून जगणारे आपले आपटे काका आता हयात नाहीत.  गेले दीड दोन महिने मधुरंजन या व्हाट्सअप कट्ट्यावर तसेच इतरत्रही काका दिसले नाहीत. काकांची तब्येत बरी नव्हती परंतु त्यांना भेटता येणे खूप अवघड होते. त्यामुळे मधुरंजन किंबहुना मधुकोष हा सुना झाला होता.  जे जात्याच मोठे असतात त्यांना सामान्यजन्य अधिक मोठे करतात कारण त्यांचे कर्तृत्व आणि दातृत्व हे तितकंच मोठं असतं. आपटे काका असेच होते. चार-पाच महिन्यापूर्वीच त्यांनी अभिवाच...