पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा

इमेज
कवितेच्या अंगणात ,गीतांच्या चांदण्यात पुष्प पहिले कवी मन हे नेहमीच जागरूक असत. सभोवताल, निसर्गातील विविध आविष्कार, ऋतुबदल ,आसपासचे सुखदुःखाचे विविध प्रसंग , हे टिपकागदाप्रमाणे त्याच्या अंतर्मनात साठत असतात हीच काव्यबीज असतात. स्वानुभव आणि परकायाप्रवेश यातून काव्य जन्म घेत. "फिरे रात्रंदिनी अवनी सुख दुःख भिडे कवी हृदयी उसंत मिळता उमटे कागदावंरी " या प्रक्रियेतून कवी व्यक्त होत राहतो. एखादी कविता किंवा गीत मला खूप आवडतं आणि ते आपल्याला का आवडते असं जर विचारलं तर त्यावेळी या कवितेमधील शब्दरचना, या कवितेमधील उपमा ,शेवटच्या कडव्यात दिलेली कलाटणी, नादमयता मांडलेला विचार असा पण काहीतरी सांगतो परंतु या सर्वांचा आपण एकत्रित विचार केला तर ते झालं कवितेच रसग्रहण . कमी शब्दात जास्त आशय आणि एकाच कवितेतून एकापेक्षा जास्त अर्थ यक्त होण ही कविता या वांग्मय प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत म्हणूनच कवीस अभिप्रेत अर्थ आणि आपणास भावलेला अर्थ हाही वेगळा असू शकतो. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लागेल लावील वेड जीवा हे आशाताईंचं सुमधुर गीत ऐकलं ( कवी म पां भावे ) आणि अपूर...