ब्रह्मचैतन्य मूर्ती

|श्री सरस्वती देवी प्रसन्न | ब्रह्मचैतन्य मूर्ती अवतरली गोंदवल्यात ब्रह्मचैतन्य मूर्ती होऊनी नामा वतार .... थोर महाराज, कीर्ती अपरंपार गात गात नाम महिमा श्रीराम जय राम जय जय राम जनासी दिला बहुत आधार लाविला कल्पवृक्ष नाममहिमेचा छाया धरण्या सर्वांवरी आशिर्वच फुले तयांची अखंड पडती भक्तद्वारी दैनंदिन प्रवचनाची फळे रसाळ, पोसती आम्हा भक्तजनां पुरवी जीवनरस , रक्षिती तारती या भवसागरा ऊर्जा देती अखंड जीवन कंठाया दैनंदिन जीवन प्रश्न जे पडती सामान्य जना सहज उत्तर तयाचे मिळते पान उघडता प्रवचना नित्य अनुभूती देती साक्षात ब्रह्मचैतन्य मूर्ती वर्णावी किती ती थोरी अपुरी पडे शब्दसंपदा भारी !