शब्द कळ्यांचे फुलणे......


kalakar

शब्द कळ्यांचे फुलणे......

अनुभवाच्या मळ्यात
शब्दकळ्या फुलतात

हर्ष विषाद घात- प्रत्याघात,सुख-दुःखं
हेच तयांचे बीज
खत- पाणी घालतात
माय बाप रसिक

शब्दकळ्या होताच फूल उलगडती विविध रंग
काही मनभावन तर काही जीवघेणे...
पहाता अंतरंगी
ज्याने हवा तो घ्यावा गंध

न कोमेजणे न सुकणे
सदा  उमलणे व फुलणे
हाच त्यांचा जीवनधर्म
या मळयाचे  मालक असती संत  व  कविजन !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी