ब्रह्मचैतन्य मूर्ती


|श्री सरस्वती देवी प्रसन्न|

ब्रह्मचैतन्य मूर्ती
अवतरली गोंदवल्यात
ब्रह्मचैतन्य मूर्ती
होऊनी नामावतार ....
थोर महाराज, कीर्ती अपरंपार
गात गात नाम महिमा
श्रीराम जय राम जय जय राम
जनासी दिला बहुत आधार

लाविला कल्पवृक्ष नाममहिमेचा
छाया धरण्या सर्वांवरी
आशिर्वच फुले तयांची
अखंड पडती भक्तद्वारी

दैनंदिन प्रवचनाची फळे रसाळ,
पोसती आम्हा भक्तजनां
पुरवी जीवनरस , रक्षिती
तारती या भवसागरा
ऊर्जा देती अखंड
जीवन कंठाया
दैनंदिन जीवन प्रश्न जे पडती
सामान्य जना
सहज उत्तर तयाचे मिळते
पान उघडता प्रवचना
नित्य अनुभूती देती
साक्षात ब्रह्मचैतन्य मूर्ती

वर्णावी किती ती थोरी
अपुरी पडे शब्दसंपदा भारी !


Image result for प्राजक्त फुले

टिप्पण्या

Shrikant Lele म्हणाले…
भक्तिमय काव्य!
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तू वाचून लगेच कळवलेस ,आनंद वाटला.🙏
श्री अनिल पानसे, सातारा. म्हणाले…
अरे ! १७ ता.लाच मीही आमच्या ग्रुप सोबत गोंदवल्यात होतो हो... दोन भजनीमंडळांची भजनसेवा होती. कल्पना नव्हती आणि श्रींनी योग आणला नाही. असो. साताऱ्यात आल्यावर जरूर भेटू.
आमच्या सारखे अनेक पॅराग्राफ्समधे जे मांडतात ते आपण कवितेत मोजक्या शब्दांत अधिक प्रभावीपणे मांडलंय.ही प्रतिभेची देणगी आहे.
👍👍🙏🏻🌹🙏🏻
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण अत्यंत प्रेमाने काव्य आस्वाद घेतला आणि अभिप्राय रुपी आशीर्वाद दिला खूप आनंद झाला कारण आपण दासबोध आणि संत वांग्मय यांचे मोठे अभ्यासक , प्रसारक आणि निरूपण कार आहात.🙏
अनिल पाठक म्हणाले…
भक्तिरसात पद्य रचना छान केली आहे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अनिल, तुझा अभिप्राय वाचून आनंद मिळतो.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण