डायरी



डायरी


नववर्ष लेवुनी आले
३६५ दिवसाची पाने
सुखदुःखांच्या धाग्यांनी
विणलेली बांधणी
माहित आहेत रंग
काही धाग्यांचे
काही मात्र गुलदस्त्यात ....
संकल्पांचा बुकमार्क घेईल
नव्याचे नऊ दिवस
होणार नाहीत
याची काळजी

प्रौढत्वी निज शैशवास जपणे ,
सत्पात्री यथाशक्ती दानधर्म
काय वाचा मनोभावे सदा घडो सत्कर्म
दिले आहेत गुणांक ज्यादा व्यायाम आणि नामस्मरण यांस
कारण तेच आहे जीवनमर्म
घेईन रोज आढावा
झोपी जाण्याआधी
मिळाले किती गुण कळण्या
गुणमापनपट्टी करी उजळणी पानोपानी

दूर ठेवीन संकल्प विकल्पास
जागवून सत्प्रवृत्ती हरदिनी
वर्षाअखेरीस मांडीन ताळेबंद
सत्कर्माचे भांडवल देईल उत्तम परतावा
राम गावा राम ध्यावा । राम जीवींचा विसावा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण