तमसो मा ज्योतिर्गमय...

श्री सरस्वती प्रसन्न
Carona Lockdown

 ५ एप्रिल २०२०

तमसो मा ज्योतिर्गमय...

काल मला  सकाळी दूध आणताना, सोसायटीतील लहान मुलांच्या बगीच्यातील

घसरगुंडी आणि सीसॉं फारच खिन्न वाटले ,चुपचाप बसले होते बिचारे काय करणार

घरात बसलेतना त्यांचे सवंगडी 

फार वाईट वाटतं निरागस खेळत्या मुलांच्या कोंडमारी बाबत

ज्यांच्या घरी आजी आजोबा आहेत ती मुलं निदान खेळत आहेत,

 साधे खेळ शिकत आहेत आणि काही मुलांना मात्र एरवी दुरापास्त आई बाबा घरी दिसत आहेत

पण आई पाठमोरी सतत घरकामात आहे दंग, कारण कामवाली मावशी येत नाही

बाबा ही थोडे व्यस्त

काय बोलयचं मुलांशी

 काय खेळायच , पुढे काय होणार म्हणून त्रस्त

ज्यांच्या घरी वृद्ध ,विकलांग ते ही जास्त चिंताग्रस्त

हातावरील पोट आणि पोटावरील हात असे सारेचजण भांबावलेले ,धास्तावलेले  आणि 

पस्तावलेले सारं विश्व 

वेगळ्याच विषाणुने केलं आहे सर्वांनाच अंतर्मुख

काही नवीन शब्द  कळाले आणि झाले  निर्माण  टाळूच तयांचा उच्चार

मात्र कौटुंबिक ऐक्य, कौटुंबिक सुख, संयम, सामाजिक ऋण  हे पुस्तकातील शब्द

आता झालेत जनामनात अर्थवाही त्यांना करू  जवळ  ...

करूया त्रिवार वंदन डॉक्टर्स , आरोग्य सेवा ,सफाई सेवा आणि पोलीस सेवांतील आणि  अन्य  अत्यावश्यक  सेवा देणाऱ्या बंधू भगिनींना

 ज्यांवरच आता सारी भीस्त 

करूया एक सलाम आपुलकीने ,अभिमानाने आपल्या आश्वासक,  निरंतर उत्साही कर्मयोगी प्रधानमंत्री यांना आणि  म्हणूया     
तमसो मा ज्योतिर्गमय..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी