ध्यासपंथी गोखले काकू
ध्यासपंथी गोखले काकू माधवी नाम लेवून, सदा हसतमुख राहून सहज मधूर लाघव संवाद साधीला आपण ... बहुधा बोल तर कधी अबोल राहून पाठीवरी आश्वासक थाप दिली आपण ... आम्हा सर्वां चिरंतन मधूकोशी धाग्यात गुंफले आपण... अक्षर योगी आपण , साहित्य प्रेमी आपण, शब्दमोल जाणून स्पष्ट शब्दोच्चार करीत केले विविध अभिवाचन आपण ... साक्षेप समर्थांचा" हे अभिवाचन अधिक ठसले ,बिंबले आमच्या मनी हृदयी अबालवृद्ध यावरी अपार संस्कार केले आपण... २६ जानेवारी १५ ऑगस्ट असता उत्साह ओसंडित प्रोत्साहित केले आपण... अहो वर्तनातून देव देश धर्म याचे मर्म सांगीतले आपण.... गीताप्रेमी कर्मयोगी आपण... संस्कृत पठण विविध श्लोक सुभाषिते शिकवत शहाणे केलें आम्हा आपण ... देहभोग सोशिले परि उच्चार त्यांचा न केला आपण... रसरशीत जीवन जगला आपण... कार्यसुगंध दरवळे म्हणूनी काव्य रचण्या शब्द सारे आले धावून ... समर्थ रामदास रचित पावन भिक्षा श्लोक (कोमल वाचा दे रे राम....१२ श्लोक ) सारे गुण अंगीकारले आपण अन् इंदिरा एकादशीचा योग साधून आम्हा अंतर्मुख करित पारखे केले आपण.. ...
टिप्पण्या