पोपट दादा ...पोपट दादा ...

 



पोपट दादा ...

पोपट दादा...

झोकात असता तुम्ही सदा

हिरवा अंगरखा

लाल चोच 

डौल तुमचा किती छान !


आहात किती दिमाखात 

बोटं घातली आम्हीं तोंडात

शहाणें तुम्ही फार

सोलताय दाणा तुकवत चोच अन मान

हरपून गेलं आमचं भान


करून खटपट

खाताय कणीस किती पटपट 

 रांगेत बसलेत सवंगडी

पहात वाट

आहे खात्री तयांना 

खाणार नाही तुम्ही कणीस पूर्ण ,

          देती असे क्षण  आम्हां

           श्रद्धा सबूरी शिकवण 


आहात किती तुम्ही गोड गोड

येणार ना... रोज रोज...

आम्हाला लागली तुमची ओढ

आम्हाला लागली तुमची ओढ....



टिप्पण्या

जयंत कुलकर्णी म्हणाले…
मानवतेची शिकवण देणारे शीघ्र काव्य.
नितीन म्हणाले…
वा छान सुटसुटीत काव्य.
Nita म्हणाले…
सुंदर दृश्य समोर उभे राहिले,पोपट दादांचे रंगच न्यारे..

खूप छान कविता रचली काका.
Jayant Kale म्हणाले…
खूपच छान. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.👌👌
अनामित म्हणाले…
सुरेख बालगीत आणि मोठ्यांसाठी मोठा आशय.
अशोक आफळेO म्हणाले…
लेले साहेब साधी सोपी तालबध्द रचना. ग
ह पाटलांची फुलपाखरू छान किती दिसते
किंवा कुसुमाग्रजांची उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले या कवितांची आठवण
झालीआचार्य अत्रे नेहमी म्हणत सोपे लिहिणे
खूप अवघड असते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी