आकाशीचा अदभूत दिवा.....

 
(भोपाळ येथील कलियासोत  जलाशय दिवाळी नोव्हेंबर १३,२०२३ फोटो सौजन्य  शालेय बालमित्र श्री सुनील भिडे सोलापूर)


आकाशीचा अदभूत  दिवा...


दिपावली प्रकाश पर्व 

रविअस्तचली 

किती  हे मोहक  भाव

साठवले ते उरी अंतरी

परि 

अपुरे दोन नयन

टिपलं छायाचित्र म्हणून


 जलाशयी निर्मळ स्वभाव

 म्हणून उमटतसे रवि बिंब प्रतिबिंब 

म्हणती  सूर्य देव 

जलाशया सहन केलास

 तू दिनभर माझा तापभार 

 थांब आता क्षणभर

येत आहे शशी लवकर

 घेवून शितलभाव


  तापत्रय ते तपत्रय हा तुझा प्रवास

पाहिला मी जवळूनी

 तुझे हे अपार सायास 

या कारणे दिला हा प्रसाद  

वाट हा सर्वाना तुझा मोद.


 सांगतसे हे प्रतिबिंब

निसर्गाप्रती ठेवा कृतज्ञ भाव

नका ठेवू वृथा गर्व 

सर्व ठिकाणी श्रेय घेण्या मीच प्रथम





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण