आण मराठीची


 आण मराठीची


मराठी असे आमुची मायबोली

संत कवी गण साहित्यिक

फुलवती तिच्या वैभवाचा मळा

दाविती शारदीय चंद्रकळा


ज्ञानोबा म्हणती शब्द जैसे कल्लोळ अमृताचे

वाचू नित्य ज्ञानेश्वरी, संत साहित्य, शिवबा वीर गाथा

उमगण्या तिची मोहक शब्दकळा

सहजची मग लागेल तिचा लळा

जागवील विवेक ,मिळेल स्फूर्ती

महती मातृभाषेची उतरेल नव्या पिढीच्या गळा


वाचू बोलू लिहू नित्य मराठी

राहील मग ती सदा आपुल्या ओठी

कधी न लागेल तिला ओहोटी

आण आज ही घेऊया

समृद्धी...वैभवाची ती खाण

आहे किती खोल जाणूया....


संस्कृत भाषा ही जननी

साऱ्या भारतीय भाषा तिच्या भगिनी

मान ठेऊ साऱ्या भाषांचा

भाळी जरी टिळा मराठीचा !






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण