मांडली शब्दांची आरास -शारदा स्तवन
श्री गणेश प्रसन्न
श्री शारदा देवी प्रसन्न
तव पूजेस्तव,
होऊनी सर्व संत कवीगण उपस्थित
शब्द हेचि भाव
शब्द हेचि गंध
शब्द हेचि फुले
शब्दांचाच घंटानाद
शब्दांचेच निरांजन
तुला ओवाळण्या
एक पूजा अशीही की प्रसाद प्रथम अन पूजा नंतर
साधन अन् साध्य यात नुरले अंतर
अशीच शब्द पूजा
शब्द माला
अखंड बांधितो
आनंदात राहतो
मी तुझिया कृपेने
ध्यानी सदा सोज्वळ रूप
नित्य देती स्फुरण
अगणित असती कर
दिसती चार
झंकारती वीणा मांडीवरी दोन
एक करी ग्रंथ
एक करी अक्षमाला
फुलवून पिसारा मयूर
सहज सहर्ष संगतीला
साहित्य शास्त्र संगीत ६४ कला यात सदा वास विहार
स्मरता तुला सत्वर
जायी जडता मती
उमजे ज्ञान मिळे गती
देव तिन्ही तुला वंदिति
ओंकारी तू अर्धचंद्र बिंदूत वसती
सारे संत रचती कवन गाती रुपगुण स्तुती
अखंड अगाध अक्षय पात्र
वर्णू तुझा किती महिमा
शब्दा शब्दात भरून
राहिलीस तरीही तू उरून
जन्मले हे काव्य
शारदे हा तुझा प्रसाद
जेथ राही मी
तो तुझा प्रासाद
पुनः पुनः नमितो अर्पितो
शारदा माते
तव चरणी नंदकिशोर
हे शारदा स्तवन !🙏🙏🙏
नंदकिशोर लेले
टिप्पण्या
आशयघघनताहीआहे.मुकतछंदातील उत्तम रचना
शारदा स्तवन वाचले.
"शब्द आपण सांडले
वीणा नादासम,
स्तवन,पूजन साधले
शब्दामृत सानंदे करा भक्षण !"
🤓👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
एखाद्या धार्मिक मासिकाला जरूर पाठवा.
उत्तम काव्या बद्दल हार्दिक अभिनंदन!⚘️👏
पावशा पक्षी पेरते व्हा... पेरते व्हा, असा संदेश देतो,त्या धर्तीवर
तुम्हांला मी लिहिते व्हा.. लिहिते व्हा असं सांगतो.