मांडली शब्दांची आरास -शारदा स्तवन

 श्री गणेश प्रसन्न 

श्री शारदा देवी प्रसन्न 


मांडली शब्दांची आरास  

तव पूजेस्तव,    

होऊनी सर्व संत कवीगण उपस्थित 

शब्द हेचि भाव

शब्द हेचि गंध

शब्द हेचि फुले   

शब्दांचाच घंटानाद

शब्दांचेच निरांजन

तुला ओवाळण्या

एक पूजा अशीही की प्रसाद प्रथम अन पूजा नंतर 

साधन अन् साध्य यात नुरले अंतर

अशीच शब्द पूजा 

शब्द माला

अखंड बांधितो 

आनंदात राहतो 

मी तुझिया कृपेने

ध्यानी सदा सोज्वळ रूप 

नित्य देती स्फुरण

अगणित असती कर  

दिसती चार

झंकारती वीणा मांडीवरी दोन

 एक करी ग्रंथ

एक करी अक्षमाला 

फुलवून पिसारा मयूर

सहज सहर्ष संगतीला 

साहित्य शास्त्र संगीत ६४ कला यात सदा वास विहार

स्मरता तुला सत्वर 

जायी जडता मती   

उमजे ज्ञान मिळे गती 

देव तिन्ही तुला वंदिति 

ओंकारी तू अर्धचंद्र बिंदूत वसती

 सारे संत रचती कवन गाती  रुपगुण स्तुती 

अखंड अगाध अक्षय पात्र

वर्णू तुझा किती महिमा

शब्दा शब्दात भरून 

राहिलीस तरीही तू उरून

जन्मले हे काव्य 

शारदे हा तुझा प्रसाद 

जेथ राही मी 

तो  तुझा प्रासाद

पुनः पुनः नमितो अर्पितो  

शारदा माते 

तव चरणी नंदकिशोर

हे शारदा स्तवन !🙏🙏🙏

 नंदकिशोर लेले

टिप्पण्या

Jayant Kale म्हणाले…
अत्यंत सुंदर. माता सरस्वतीची कृपया तुझ्यावर अशीच राहो.🙏
Gurunath Deshpande म्हणाले…
शारदा स्तवन सुंदर.
अनिल पाठक म्हणाले…
शब्दांमधून ईश्वराचे दर्शन घडले. खूप छान नंदू
अनामित म्हणाले…
शारदा स्तवन छान जमले आहे.त्यात लय ,ताल नाद तर आहेच पण
आशयघघनताहीआहे.मुकतछंदातील उत्तम रचना
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
श्री आफळे साहेब नमस्कार .आपण लगेच वाचून उत्तम अभिप्राय दिलात मला खूप आनंद झाला .आपण मला नेहमीच प्रोत्साहन देता. धन्यवाद
अविनाश पंडीत मधुकोश पुणे म्हणाले…

शारदा स्तवन वाचले.
"शब्द आपण सांडले
वीणा नादासम,
स्तवन,पूजन साधले
शब्दामृत सानंदे करा भक्षण !"
🤓👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपला नादमय अभिप्राय वाचून आनंद वाटला.
अनिल पानसे म्हणाले…
सुंदर ! शारदास्तवन शारदेचेच कृपेने ! अशीच वाङमय सेवा घडत राहो. 🌷🌷
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार श्री अनिलजी आपण शारदा स्तवन लगेचच वाचून आशीर्वादपर अभिप्राय दिलात.खूप आनंद झाला; समाधान वाटले. थोर समर्थभक्त श्री पद्माकरजी बोंडाळे हे दासबोध सत्संग यात अत्यंत रसाळ विवेचन करतात. त्यातूनच ही मूळचें २०११ लां सुचलेले शारदा स्तवन याचे परिषकरण झाले.
अविनाश आपटे सवांदी वादक मधुकोश म्हणाले…
शब्द शारदा स्तवन,हे एक छान ,सात्विक भावाचं साहित्य बनलं आहे.हे केलेलं काव्य नसून स्फुरलेलं आहे. यातून तुम्ही एक 'मुरलेले' कवि आहात,असं जाणवतं.
एखाद्या धार्मिक मासिकाला जरूर पाठवा.
उत्तम काव्या बद्दल हार्दिक अभिनंदन!⚘️👏
पावशा पक्षी पेरते व्हा... पेरते व्हा, असा संदेश देतो,त्या धर्तीवर
तुम्हांला मी लिहिते व्हा.. लिहिते व्हा असं सांगतो.
अनामित म्हणाले…
नंदू....फारच सुंदर काव्य झाले आहे सरस्वतीचे... नुरले हा शब्द खूपच भावला...
जयंत कुलकर्णी म्हणाले…
अतिशय भावपूर्ण सुंदर रचना शारदा स्तवन नंदुजी हे आपुले कवन
अशोक परांजपे म्हणाले…
खूप छान काव्य रचना.
आजच्या वसंत पंचमीच्या दिवशी लेले आपण केलेली शब्दरुपी पूजा माता सरस्वतीच्या चरणी नक्कीच रुजू झाली असेल
विजय रणसिंग म्हणाले…
नंदकिशोर जीं श्री सरस्वती पूजन वसंत पंचमी निमित्ताने अतिशय अप्रतिम काव्य पुष्पाजंली ने केले आहे, आपली काव्य प्रतिभा तिला तोड नाही. लिहीत जा. खूप छान 🙏
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार विजय जी आपण अतिशय आपुलकीने नेहमी माझे लिखाण वाचून अभिप्राय देता खूप आनंद होतो
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सारी शारदा कृपा आहे आपल्या अभिप्रायाने नवउर्जा मिळते. मनःपूर्वक धन्यवाद.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण नेहमी माझे लिखाण वाचून अभिप्राय देता खूप आनंद होतो. खूप खूप धन्यवाद.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार श्री शिरीषजी आपण साहित्यातील चांगले जाणकार आहात आपल्या अभिप्रायाने नवउर्जा मिळते. मनःपूर्वक धन्यवाद.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण