पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिंब प्रतिबिंब.....

इमेज
 बिंब प्रतिबिंब दृश्य बहु मनोहर.....  हे खरं की ते खरं...   भास आभास  सारा मायेचा खेळ,  जड ,चंचल, आणि निश्चळ  संत दाविती भेदाभेद  साधती योग्य मेळ * काव्य उमले फुले हेचि समर्थ वांग्मय अभ्यासाचे फळ अर्पण करतो सदगुरू चरणी होण्या सुफळ. * या ओळीचा गर्भितार्थ मानत मानत शिकवावे , संत सज्जन यांचा जन्म हा मानवांचा उद्धार करण्यासाठी झालेला असतो. आपण  ज्ञानी मोठे असलो तरीही ते स्वतःला सर्वसामान्य असे दाखवतात कारण त्यांना लौकिकातच राहून कार्य करावयाचे असते.  मानत मानत शिकवावे  बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध  उद्धरीत जावे सकळजना  असे त्यांचे कार्य असते.  संत नि:स्पृह असतात त्यांची  लक्षणे दासबोध यांत सांगितली आहेत  (  दशक १४ समास १ अखंड ध्यान नि:स्पृह लक्ष्मण नाम). Photo courtesy-   सारे फोटो हे चंबळ नदी परिसर , अभयारण्य  डॉक्टर घनश्याम बोरकर. डॉक्टर, निसर्गप्रेमी, संत साहित्य गाढे अभ्यासक प्रतिभावंत कवी, साहित्यिक, उद्योजक असे बहुआयामी मनस्वी व्यक्तिमत्व आहे.  त्यांची ओळख माझा सोलापूर येथील दयानंद कॉलेज...

रघुपती राघव गजरी गजरी रसग्रहण

इमेज
                       श्री सरस्वती प्रसन्न प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा. रेडिओवरील पहाटेचे भक्ती संगीत याने अंतर्मनावर केलेले संस्कार हे अमिट आहेत.त्यातीलच हे अतिशय मधुर गीत.... गीतकार पी सावळाराम, अष्टपैलू गायिका आशा भोसले आणि संगीतकार वसंत प्रभू  जणू त्रिवेणी संगमच. गळ्याची सहज फिरत घेत घेतलेला आदरणीय आशाताई यांचा पहिला आलाप श्रोत्यांचे कान टवकारतो ...रघुपती राघव ....गजरी गजरी.... हा उच्चार दीर्घ करून हे राम आगमन होत असल्यानं सारी वृक्षवल्ली हर्षाने नाचू बोलू डोलू लागली आहे, पक्षांचे गोड कूजन सुरू आहे हे भाव प्रदर्शित होतात. प्रतिभावंत कवी गीतकार पी सावळाराम यांचे शब्द शबरी आणि रामाचे , भक्त आणि देव याचे आगळं नाते स्वतःच्या स्वरातून पुढे त्या रसिकांच्या गळी उतरवतात. जशी आई खूप दिवसांनी, वर्षाने आपला बाळ भेटीस येत आहे त्यावेळी ती आनंदात त्याला आवडत असलेले सारे काही गोड धोड पदार्थ तयार ठेवते....आणि त्याच्या भेटीची आस तिला लागलेली असते तीच आस शबरीची आहे. रामनाम जपे वदे वाचे ती शबरी करी मानसपूजा ती भ...

दवबिंदू......

  दवबिंदू निसर्ग अविष्कार सौंदर्य  व्हिडिओत लोभस टिपलं आहे .. ज्येष्ठ बंधू श्रीकांत यानं (now on USA tour) मी मोहून गेलो.... काव्य सुचेल असे वाटू लागले  मग पहाटे ते अवतरले ते काव्य     दवबिंदू...  सोनेरी पिवळे, तांबूस तुरे तोलून धरती दवबिंदूस दवबिंदू म्हणती तुऱ्यास  अणकुचीदार तरी सहन करता भार  तुरे म्हणती कसला भार  आम्ही नार... तू सरदार! खुलवीसी सौंदर्य अमुचे  म्हणूनी  वाट पहातो  तुला झेलण्या तासन् तास.. असे मैत्र फुले डोले  दिलखुलास..   तोशीस घेऊन स्नेह जपणे  शिकवी निसर्ग आम्हांस असे संवाद पडण्या कानी   जावे नित्य पहाटे फिरण्यास  डोळ्यांचे कान करून करावे थोडं बोलके मौनास...               करावे थोडं बोलके मौनास......