कवितेचं गाणं .....
कवितेचं गाणं होतं म्हणजे काय होतं ?
पक्षी कूजन श्रुती वर पडतं
तान्हुलं पाळण्यात हसतं,
वाळा नाद कानी पडतो...
काही दिवसांत बाळाचा आ... आ बोल कानी पडतो
माऊली सुखावते ....
नदीच्या पाण्यावर लहरी नाद जाणवतो
चित्रकार चित्रात रंग भरू लागतो
चित्रकार चित्रात रंग भरू लागतो
मूर्तिकाराने साकारलेल्या मूर्तिस टिळा लावला जातो
वारा झुळूकतो अन्
तृण पात्यांवर दवबिंदू अवतरतात
धरतीवर प्राजक्ताचा सडा पडतो
अत्तराची कुपी उघडली जाते
मोराचा पिसारा फुलू लागतो
वातीचे ज्योतीत रूपांतर होत
स्थितीला गती प्राप्त होते
क्षण भर कां होईना , क्षण भर कां होईना
जिवा- शिवा ची गाठ पडते, जिवा- शिवा ची गाठ पडते
_ नंदकिशोर लेले
टिप्पण्या
जीवाची प्रभात आणि निसर्ग प्रभात असा
योग यात येतो.जीव ,शिवात लीन होतो
तीच जीवाची मुक्तीची प्रभात असते.
व्यक्ती जीवनाची सार्थकता या प्रभाती
होते हे सत्य यात मांडले आहे.
छान.
शुभेच्छांसह,
श्रीराम
बाळाचे बालपण आईला कसे सुखावते
चित्रकाराची निर्मिती रंग भरता भरता कशी साकारते
वर्षा ऋतुत निसर्ग कसे रंग भरतो किंवा
देवासमोरील तेवणारी प्रसन्न ज्योत
ईश्वरभक्तीच्या तल्लीन ते कडे कशी नकळत घेऊन जाते
या प्रत्येक काव्यातून रचनेतून खरोखर मन प्रसन्न होते हेच तर आम्हाला हवे आहे ना!
खूप छान 👌