कवितेचं गाणं .....


कवितेचं गाणं होतं म्हणजे काय होतं ?



प्राची वर रविबिंब उमटतं 
पक्षी  कूजन श्रुती वर पडतं 
तान्हुलं पाळण्यात हसतं, 
वाळा नाद कानी पडतो... 
काही दिवसांत बाळाचा आ... आ बोल कानी पडतो 
माऊली सुखावते .... 

नदीच्या पाण्यावर लहरी नाद जाणवतो 
चित्रकार चित्रात रंग भरू लागतो
मूर्तिकाराने साकारलेल्या मूर्तिस टिळा लावला जातो
वारा झुळूकतो अन्
तृण पात्यांवर दवबिंदू अवतरतात

धरतीवर प्राजक्ताचा सडा पडतो 
अत्तराची कुपी उघडली जाते
मोराचा पिसारा फुलू लागतो

वातीचे ज्योतीत रूपांतर होत
स्थितीला गती प्राप्त होते
क्षण भर कां होईना , क्षण भर कां होईना
जिवा- शिवा ची गाठ पडते, जिवा- शिवा ची गाठ पडते
_ नंदकिशोर लेले 

टिप्पण्या

हिमवान म्हणाले…
कविता वाचली.सुंदर भावकविता!
जीवाची प्रभात आणि निसर्ग प्रभात असा
योग यात येतो.जीव ,शिवात लीन होतो
तीच जीवाची मुक्तीची प्रभात असते.
व्यक्ती जीवनाची सार्थकता या प्रभाती
होते हे सत्य यात मांडले आहे.
छान.
शुभेच्छांसह,
श्रीराम
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
नमस्कार ती. दादा, मी सिमीत अर्थ केला होता, त्याला आपण खूपच व्यापकता समर्पकता दिली. हे काम समीक्षकच करू शकतो. आपला आशीर्वादरूपी अभिप्राय मिळाला हे माझं भाग्य.
विजय रणसिंग म्हणाले…
अप्रतिम रचना श्री नंदकिशोर जीं 👌
बाळाचे बालपण आईला कसे सुखावते
चित्रकाराची निर्मिती रंग भरता भरता कशी साकारते
वर्षा ऋतुत निसर्ग कसे रंग भरतो किंवा
देवासमोरील तेवणारी प्रसन्न ज्योत
ईश्वरभक्तीच्या तल्लीन ते कडे कशी नकळत घेऊन जाते

या प्रत्येक काव्यातून रचनेतून खरोखर मन प्रसन्न होते हेच तर आम्हाला हवे आहे ना!
खूप छान 👌
श्री रमेश देशमाने मधुकोश म्हणाले…
कवितेचे गीत फार सुंदर केलं आहेस तुझ्या प्रतिभा शक्तीला सलाम तुझ्या प्रतिभा शक्तीला सलाम नंदू तू खरच अत्यंत प्रज्ञावंत असा कवी आहेस आणि कुठल्याही कवितेचं समीक्षण किंवा रसग्रहण फार चांगल्या पद्धतीने तुला करता येते देशमाने
अनामित म्हणाले…
सुप्रभात श्री विजयजी. आपुलकीच्या अभिप्राय याने खूप बरं वाटलं🙏🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण